Rewari Boiler Blast: हरयाणाच्या लाइफ लाँग कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट; ४० हून अधिक कामगार जखमी

Haryana Boiler Explodes: लाईफ लाँग कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन सुमारे ४० कामगार जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
Rewari Boiler Blast
Rewari Boiler BlastGoogle
Published On

Rewari Boiler Blast Haryana

हरयाणातील (Haryana) रेवाडी येथे शनिवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. रेवाडीतील धरुहेरा औद्योगिक परिसरात बॉयलरचा स्फोट झाल्याने अनेक जण गंभीररित्या भाजले (Rewari Boiler Blast) आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. लाईफ लाँग नावाच्या कंपनीत बॉयलरच्या स्फोटामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. (Latest Marathi News)

हरयाणातील रेवाडी येथे बॉयलरच्या स्फोटात ४० जण गंभीररित्या भाजले. त्याचबरोबर ६० जणांना किरकोळ दुखापत झाली (Boiler Explods) आहे. ही घटना धरुहेरा येथील लाईफ लाँग कंपनीत घडली. ही कंपनी हिरोचे सुटे भाग बनवते. घटनेची माहिती मिळताच (Boiler Blast) अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बचाव पथकाने जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारखान्यात बॉयलरचा स्फोट

जखमी कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोलीस विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. टीव्हीनाईन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल सर्जन डॉ. सुरेंद्र यादव म्हणाले, रेवारीच्या धरुहेरा येथील एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला (Haryana Boiler Explodes) आहे.

कारखान्यात रुग्णवाहिका पाठवण्यात आली (Life Long Factory) आहे. या अपघातात अनेकजण गंभीररित्या भाजले आहेत. सुमारे ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एक गंभीर रुग्ण असून त्याला रोहतकला पाठवण्यात आले आहे.

Rewari Boiler Blast
Satara Blast News : सातारा शहरानजीक शासकीय कार्यालयात स्फाेट, परिसर हादरला; अधिका-यांचे ताेंडावर बाेट

अपघातात एकूण 100 जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी धारुहेरा औद्योगिक परिसरात असलेल्या लाईफ लाँग कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन सुमारे ४० कामगार भाजले. घटनेनंतर लगेचच तेथे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सांगितले की, अनेक जखमींना रेवाडीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. काहींना दिल्ली आणि गुरुग्राममधील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं (Blast News) आहे. पोलिसांनी सांगितले की, कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना सायंकाळी ५:५० च्या सुमारास घडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या.

रेवाडी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मजूर मनीष कुमार यांनी सांगितले की, ते शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास काम करत होते. त्यानंतर अचानक स्फोट (Haryana News) झाला. त्यांनी सांगितले की, या कंपनीत १५० लोक काम करतात. या अपघातात एकूण 100 जण जखमी झाले आहेत. मात्र या अपघातात ४० जण गंभीररित्या भाजले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की, काही कामगार ७० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत.

Rewari Boiler Blast
Bengluru Cafe Bomb Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपींवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर, एनआयएने फोटो केला प्रसिद्ध

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com