Nagpur Crime: रिक्षा चालकाची समयसूचकता अन् पोलिसांची तत्परता! ३ वर्षाच्या मुलीचं अपहरण करणारा आरोपी अटकेत

आरोपीने मुलीला ऑटोने मेन रेल्वे स्टेशनला नेले होते. तिथून आरोपी मुलीसह रायपुरला पळून जाण्याच्या तयारीत होता.
Nagpur Crime
Nagpur CrimeSaamtv
Published On

Nagpur Crime News: नागपूर शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरात तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून पळून जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ऑटो चालकाच्या समय सुचकतेमुळं रेल्वे पोलिसांनी काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime
NEET Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी! शेतात काम करत केला अभ्यास; आता होणार डॉक्टर...

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 10:30 वाजता नागपूरच्या (Nagpur) इतवारी रेल्वे स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचे वडील तिकीट काऊंटर तिकीट काढण्यासाठी रांगेत गेले असताना साधून आरोपीने तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. वडिलांनी मुलीचा शोध घेतला असता सापडत नसल्याने पोलीस तक्रार केली.

पोलिसांनी समयसूचकता दाखवत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. आरोपीने मुलीला ऑटोने मेन रेल्वे स्टेशनला नेले होते. तिथून आरोपी मुलीसह रायपुरला पळून जाण्याच्या तयारीत होता.

Nagpur Crime
Satara News : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या सातारा जिल्ह्यात; जाणून घ्या वाहतुकीतील बदल

पोलीस तपास करत असताना ऑटो चालकाने आरोपीला काही वेळ आधीच मेन स्टेशनला सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी वायरलेस वरून सूचना देत आरोपीसह मुलीला ताब्यात घेतले. आरोपीने हे कृत्य का केले याचा तपास नागपूर लोहमार्ग पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com