NEET Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी! शेतात काम करत केला अभ्यास; आता होणार डॉक्टर...

Neet Exam Result: अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत तिने हे यश मिळवले आहे, त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे...
NEET Success Story
NEET Success StorySaamtv
Published On

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded News: नांदेड जिल्हयातील कंधार तालक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणार आहे. विशेष म्हणजे तीने शेतात काम करुन नीटची तयारी केली . कुठलीही शिकवनी न लावता पहिल्याच प्रयत्नात ती नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.

ज्योती मांढरे असे या मुलीचे नाव आहे. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत तिने हे यश मिळवले आहे. सध्या तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. जाणून घेवूया ज्योती मांढरेची सक्सेस स्टोरी. (Jyoti Kandhare Success Story)

NEET Success Story
Ahmednagar Crime: आधी अपहरण अन्... स्कूल बस चालकाचे १३ वर्षीय मुलीसोबत संतापजनक कृत्य; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

कंधारवाडी गावचे शेतकरी अंकुश कंधारे यांना अडीच एकर जमीन आहे. त्यावरच कंधारे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. कंधारे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांची मुलगी ज्योती कंधारे (Jyoti Kandhare) अभ्यासात हुशार होती. ज्योतीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. बारावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेत झाले. ज्योती दहावीत असताना कोरोना मुळे लॉकडाऊन लागले होते. महामारीत लोकांचे जीव वाचवनारे डॉक्टर होते.

ते पाहून आपल्याला देखील डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली असे ज्योतीने सांगितले. बारावी झाल्यानंतर तिने नीटची तयारी सुरू केली. गावात काही जणांनी नीटची परीक्षा दिली होती. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेउन ज्योतीने अभ्यास सुरू केला. you tube वरील व्हिडिओ पाहून तिने अभ्यास केला.. (Latest Marathi News)

NEET Success Story
Satara News : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या सातारा जिल्ह्यात; जाणून घ्या वाहतुकीतील बदल

सकाळी शेतात जाऊन सहा तास काम , शेतात काही तास अभ्यास आणि घरी आल्यावर पाच ते सहा तास अभ्यास करायची. तिला नीटच्या परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळाले. ती आता स्वतःच आणि आई वडिलांचे डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

मात्र त्यातही एक अडथळा आहे. सरकारी कोट्यातून नंबर लागला तरच ती डॉक्टर होउ शकते कारण खाजगी कॉलेज मध्ये शिकायची ज्योती कंधारे हीची आर्थिक ऐपत नाही. तिला भविष्यात स्त्री रोग तज्ञ व्ह्यायच आहे. सध्या तिच्या यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com