Ahmednagar Crime: आधी अपहरण अन्... स्कूल बस चालकाचे १३ वर्षीय मुलीसोबत संतापजनक कृत्य; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

आरोपीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ahmednagar crime news
Ahmednagar crime news saam tv
Published On

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Shrirampur Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अल्पवयीन तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेने खळबळ उडाली असतानाच अहमदनगर जिल्ह्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे स्कुलबस चालकाने अपहरण करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Ahmednagar crime news
Mumbai Local CCTV: लोकलमध्ये विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाचे CCTV फुटेज आले समोर, पाहा VIDEO

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे स्कुलबसच्या चालकाने अपहरण करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला पोलीसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपी विजय गोविंद गोडसे राहणार देवळाली प्रवरा याच्यावर पोस्कोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड केले आहे. (Crime News)

Ahmednagar crime news
Eknath Shinde News: 'आदिपुरुष'मध्ये एकनाथ शिंदे होते... वादग्रस्त ट्विट व्हायरल; ठाणे पोलिसांनी केली कमेंट

धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न...

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local) २० वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. या संतापजनक घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. (latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com