Nitin Gadkari on Mobile Addiction
Nitin Gadkari on Mobile AddictionSaam Tv

Nagapur News: 'मुलं मोबाइलवर गेम खेळता खेळता कधी अश्लील व्हिडीओ पाहतील सांगता येत नाही', गडकरी संतापले

'मुलं मोबाइलवर गेम खेळता खेळता कधी अश्लील व्हिडीओ पाहतील सांगता येत नाही', गडकरी संतापले
Published on

Nitin Gadkari on Mobile Addiction: अलीकडे मुलं मैदानात कमी आणि मोबाइलमध्येच जास्त गुंग असल्याचे दिसतात. मुलांच्या मोबाइल वापरावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले आहेत.

'मोबाइल कुठून आला माहिती नाही', संपूर्ण पिढी मोबाइल ने उद्ध्वस्त केल्याचं सांगत मोबाइलवर गेम खेळताना कधी मुल अश्लील व्हिडीओ पाहतील सांगता येत नाही', असं म्हणत त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

Nitin Gadkari on Mobile Addiction
Political News: 'माझी बहीण प्रेमाने अमिताभ बच्चन म्हणाली असेल, मनावर घेऊ नका; केसरकर यांना अजित पवार असे का म्हणाले?

आज नागपुरात क्रीडा महोत्सव झाला. यामध्ये 7000 मुलांनी सहभाग घेतला. ते म्हणाले की, खेळाचे मैदान आणि स्विमिंग टँक बनवले तर मुलांना खेळायला बरं होईल, नाहीतर तुमच्या मुलांचं काय आणि माझ्या मुलांचं काय, दिवसभर मोबाइलवर बोलत राहतात. आज ते मोबाइलमध्ये कार्टून पाहतात, उद्या तीच मुलं अश्लील व्हिडीओ पाहतील, हा मोबाइल कुठून आला माहीत नाही, याने संपूर्ण पिढी उद्ध्वस्त केली आहे. (Latest Marathi News)

गडकरी म्हणाले की, ''मला एक चांगली बाग हवी आहे, असे मैदान हवे आहे जिथे लाखो मुले दररोज संध्याकाळी दोन तास मैदानावर खेळायला येतात.'' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमात व्यावसायिकांना संबोधित करत होते. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत.

Nitin Gadkari on Mobile Addiction
Shiv Sena Kalyan Melava 2023: भाजप-शिवसेनेचा टोकाचा वाद संपला? श्रीकांत शिंदेंनी एकाच वाक्यात विषय संपवला

काँग्रेसबद्दल केलं मोठं वक्तव्य

नितीन गडकरी यांनी काँग्रेसबाबत देखील मोठं केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''एकदा एका नेत्याने त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यावर त्यांनी त्याला उत्तर दिल की, ''काँग्रेस पक्षाचा सदस्य होण्यापेक्षा मी विहिरीत उडी घेईन.''

त्यांनी दावा केला की, काँग्रेसच्या ६० वर्षांच्या सत्ताकाळाच्या तुलनेत भाजप सरकारने गेल्या ९ वर्षात देशात दुप्पट काम केलं आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी ते उत्तर प्रदेशमध्ये असताना त्यांनी लोकांना सांगितले होते की २०२४ च्या अखेरीस यूपीचे रस्ते अमेरिकेसारखे होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com