Crime News : कोकणात फिरायला गेलेल्या मुंबईतील व्यापारी कुटुंबावर हल्ला, कार अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण

Mumbai tourists attacked in ratnagiri knife assault case : कोकणातील रत्नागिरीत पर्यटनासाठी मुंबईहून गेलेल्या व्यापारी कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबानं तक्रार दाखल केली आहे.
रत्नागिरीत मुंबईतील पर्यटकांवर हल्ला, कार अडवून व्यापारी कुटुंबाला निर्दयी मारहाण
Ratnagiri Tourist beaten by unknown personsaam tv
Published On

अमोल कलये, साम टीव्ही | रत्नागिरी

उन्हाळी पर्यटनासाठी मुंबईहून कोकणात फिरायला गेलेल्या कुटुंबावर रत्नागिरीत आरे वारे परिसरात अज्ञातांनी हल्ला केला. मुंबईतील पर्यटकांची कार अडवून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर चाकूहल्ला देखील करण्यात आला. या प्रकरणी पर्यटकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईतील दहिसर पश्चिमेकडील व्यापारी प्रवीण कोरगावकर हे कुटुंबासह कोकणातील रत्नागिरीत फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी आरे वारे परिसरात त्यांची कार अडवली. तसेच शिवीगाळ करून कुटुंबातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूहल्ला देखील केला. कोरगावकर यांनी घटनेनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.

व्यापारी प्रवीण कोरगावकर हे कुटुंबीयांसोबत कोकण सफरीला गेले होते. रत्नागिरीत २ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास आरे वारे परिसरात दोन गाड्यांमधून आलेल्या चार तरूणांनी कोरगावकरांच्या वाहनाला ओव्हरटेक केलं. तसेच वाहन रस्त्याच्या मधोमध वेडीवाकडी चालवून त्रास देऊ लागले. त्यानंतर कोरगावकर यांच्यासह कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून सुरुवातीला वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.

रत्नागिरीत मुंबईतील पर्यटकांवर हल्ला, कार अडवून व्यापारी कुटुंबाला निर्दयी मारहाण
Crime News : पत्नी आणि मेव्हुणीनं गळा दाबून खून केला, साडूनं शेतात मृतदेह लपवला; बीडमधील हत्याकांडानं अख्खं राज्य हादरलं

तरूणांनी कोरगावकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली. तसेच भाऊ आणि पुतण्यालाही लाथाबुक्क्यांनी मारले. मारहाणीनंतर कोरगावकर तिथून निघून जात असताना, त्यांचा पाठलागही केला. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोरगावकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

रत्नागिरीत मुंबईतील पर्यटकांवर हल्ला, कार अडवून व्यापारी कुटुंबाला निर्दयी मारहाण
Crime News: एकीकडे नातेवाईकाच्या लग्नाची धामधूम सुरू; दुसरीकडे सासू अन् जावई शेतात सापडले नको त्या अवस्थेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com