- पुणे विद्यापीठाच्या बी.फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या ३१४ विद्यार्थ्यांना अतीवृष्टीमुळे देता आली नाही परीक्षा
- बी. फॉर्मसीच्या द्वितीय वर्षाच्या pharmacology I विषयाचा आज होता पेपर
- उद्या 9 जुलैला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली
- मुंबई, ठाणे, पालघर, नालासोपारा, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणी अतिवृष्टी आणि निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगरच्या अन्न व औषध प्रशासनाने कन्नड तालुक्यातील नागड येथील मेसर्स निखिल किराणा अँड जनरल स्टोअर्सच्या गोदामावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत अत्यंत अस्वच्छ वातावरणात ठेवलेला आणि भेसळीचा संशय असलेला १३८ किलो सुट्टा गूळ जप्त करण्यात आला आहे. ज्याची किंमत सुमारे १३ हजार ८०० रुपये आहे.
- माती वाहून गेल्याने घरांची सुरक्षितता धोक्यात
- येथील दहा ते बारा कुटुंब आले उघड्यावर
- सध्या या कुटुंबातील 50 जणांना गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हलवण्यात आले
- प्रशासन घटनास्थळी दाखल
- सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्त हानी नाही
रायगड ब्रेकिंग :
० रायगडमध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरूच
० माणगावातील कुंभेवाडीकडे जाणाऱ्या रस्तावर दरड कोसळली
० कुंभेवाडी कडे जाणारा रस्ता वाहतूकीसाठी बंद
० सात गावाचा संपर्क तुटला
० दरड काढण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता
० कुंभे धबधबा पहाण्यासाठी गेलेले पर्यटकही अडकण्याची भीती
० घटनास्थळी तलाठी स्थानिक सरपंच दाखल
- पुराने वेढलेल्या बेटावर अडकलेल्या पाचही जणांना वाचवण्यात यश
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने पाचही जणांची केली सुटका
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर खोऱ्यात सलग पावसामुळे जांभोरी येथील काळवाडी क्रमांक १ व २ दरम्यान मध्यरात्री भीषण भूस्खलन झाले. डोंगराचा भाग कोसळून मोठ्या प्रमाणात माती व दगड भातशेतीत आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
रायगड ब्रेकिंग :
० महाड शहरात पुन्हा शिरले पुराचे पाणी
० सावित्री नदीने ओलांडली धोका पातळी
० सावित्री नदीची धोका पातळी 6.50 मिटर असून 7.22 मिटर वरून सावित्री नदी वाहत आहे
० महाड शहरातील सकल भागात शिरले सावित्री नदीला आलेल्या पुराचे पाणी
० महाड शहरातील दस्तुरी नाका, क्रांतीस्थंभ, भोई घाट, सुकट गल्ली आणि बाजार पेठेत पुराचे पाणी
अमरावती जिल्ह्यातून पूरपरिस्थिती संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या'पूर्णा मध्यम प्रकल्प' (विश्रोळी धरण) क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण क्षेत्रातील या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे...
वसई विरार शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहेत.
शहरातील अनेक पेट्रोल पंप हे पाण्याखाली गेल्यामुळे शहरात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
मात्र विरार पूर्वेकडील पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत असल्यामुळे 1 किलोमीट पर्यंत वाहन चालकांनी पेट्रोल टाकण्यासाठी वाहनांच्या रांगा रावल्या आहेत.
तासंतास वाहनांच्या रांगा लागून वाहन चालक उभे आहेत.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर-माध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे,त्यामुळे नांदूर-माध्यमेशवर जवळील खानगावथडी येथील सिन्नर कडे जाणाऱ्या महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे,दोन्ही बाजूच्या नागरिकांनी पाणी ओसरे पर्यंत पुलाचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे.
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रायगड किल्ल्यावर जाणारा चित दरवाजा–नाणे दरवाजा पायरी मार्ग 8 आणि 9 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, दगड घसरणे आणि झाडे पडण्याचा धोका वाढल्याने महाडचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पोपट ओमासे यांनी हा आदेश जारी केला आहे. हवामान सुधारल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असून, नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे...
भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी 'ऑरेंज' आणि 'रेड' अलर्ट जारी केल्यामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी कचरा डेपो येथे सुरू असलेल्या बांधकामादरम्यान डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच अन्य बचाव पथके घटनास्थळी दाखल होऊन बचाव व मदतकार्य सुरू केले आहे.
केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 18 महिने उलटून गेले आहेत.. परंतु या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे... इतर सात आरोपी सध्या बीड व लातूर येथील कारागृहात असून कृष्णा आंधळे हा मात्र अद्याप पर्यंत पोलिसांना मिळून आलेला नाही.
भिमाशंकर माळीण आहुपे, डिंभे आणि भीमाशंकर भागात विक्रमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून माळीण फाट्यावरही रस्ता बंद झाला आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने माळीण, काळवाडी आणि परिसरातील इतर धोकादायक भागांतून सुमारे ७०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. माजी मंत्री व स्थानिक आमदार दिलीप वळसे-पाटील स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पावसाच्या अनिश्चिततेत पेरणी पूर्ण केलेल्या लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आता बोगस बियाण्यांचा फटका बसला आहे, जळकोट आणि उदगीर तालुक्यातील अनेक ठिकाणी पेरलेले विविध कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवली नसल्याच्या तक्रारी समोर आल्यात, त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत
रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने थेट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात अंघोळ करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे, पालिका प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डे बुजून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घ्यावा अशी मागणी देखील आंदोलन करता सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पातील बांधकामाधीन इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. एनडीआरएफ अग्निशामन दल यांच्याकडून रेस्क्यू सुरू
गोकुळ दूध संघ निवडणुकीची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. गोकुळ हा ब्रँड टिकावा... त्यात राजकारण होऊ नये आणि दूध संघाची प्रतिष्ठा.. स्वायत्तता टिकावी या मागणीसाठी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आत्मकलेश आंदोलन सुरू केले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. युवराज येडुरे यांनी आज आत्मक्लेष आंदोलन केले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज बीड जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले. जिल्ह्याच्या सीमेवर भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात पालखीचे जंगी स्वागत केले. श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गजानन महाराजांच्या दिंडीचा आजचा मुक्काम बीडमधील शक्तीकुंज वसाहत येथे असून, उद्या ही पालखी परळी नगरीत दाखल होणार आहे. पुढील चार दिवस पालखीचा मुक्काम बीड जिल्ह्यात असणार असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. निंबायती गावातील नदीकाठच्या परिसराला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी ८ दिवसा साठी सस्पेंड एकनाथ शिंदेचा आदेश..
आपत्ती व्यवस्थापन यांची जबाबदारी आहे प्रत्येक ठिकाणी आपत्ती प्रमुख यांचा जाणं महत्वाचा आहे..
एकनाथ शिंदे कुठे ही आपत्ती प्रमुख सहाय्यक आयुक्त यासीन तडवी कुठे ही गेली नाही आहे...
मुसळधार पावसाचा फटका आता सायन–पनवेल महामार्गालाही बसला आहे. कळंबोली परिसरात पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणारा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातूनच अत्यंत सावधपणे मार्ग काढावा लागत असून वाहतुकीचा वेगही मोठ्या प्रमाणात मंदावला आहे.
राज्यात पावसाचा जोर सुरू असताना धुळे जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याने अलनिनोचा प्रभाव धुळे जिल्ह्यात जाणवणारा असल्याने कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अलनिनो बाबद अलर्ट दिला आहे,
संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानानंतर पालखी पादुका सर्वप्रथम हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या अनगडशहा वाली बाबा यांच्या दर्ग्यावर दाखल झाल्या. संत तुकाराम महाराजांचे शिष्य मानल्या जाणाऱ्या अनगडशहा वाली बाबा यांच्या दर्ग्यात पालखीची पारंपरिक पहिली समाज आरती मोठ्या उत्साहात संपन्न..
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पुतळ्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना पक्षात वाद
विधानसभेनंतर काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्याचं अजूनही राहुल गांधी यांच्यावर प्रेम..
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची भाजपवर टीका मात्र राहुल गांधी यांचं केलं कौतुक..
'वरच्या लेव्हलला राहुल गांधीला त्रास करतात, तो एकमेव माणूस आहे. सत्ता पलटी करणारा,( शिवसेनेच्या नेत्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला) राहुल गांधी आहेत ते आहेत ते आम्ही सांगतो, त्या पद्धतीने अस्वस्थ आहेत'
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुतळ्यासाठी बसवण्यात आलेल्या छबुतरा हटवल्यामुळे शिवसेना पक्ष आक्रमक..
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे बसविण्यात आलेले स्मार्ट वीज मीटर तातडीने हटवून पूर्वीप्रमाणे पोस्टपेड वीज मीटर बसविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, वाघळी येथील सोसायटीसमोरील महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते यावेळी महावितरणचे कर्मचारी आंदोलनात ठिकाणी उपस्थित होते .
महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नर्स मारहाण प्रकरण
विष्णूनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तीन जणांना केली अटक
अटक आरोपींची नावे रमेश पवार प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे
लवकरच नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करणार
डॉ प्रवीण कुमार हवामान विभाग शास्त्रज्ञ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात उद्यापासून पुढील चार ते पाच दिवस पावसाची विश्रांती राहणार आहे. विदर्भासह मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार.
आज सकाळपासून मुरबाड तालुक्यात विजेच्या गडगडाटासह सह पाऊस पडतोय. यामुळे मुरबाड तालुक्यातील खापरी वैतागवाडी येथे दोन जणांवर विज पडल्याने जखमी झाले आहेत.
वसई-विरार शहरात सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे.
नालासोपारा पूर्वेतील गरळपाडा परिसरात मैदानात साचलेल्या पाण्यात मित्रांसोबत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने १३ वर्षीय मुलाचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला.
खडकवासला धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुळामुठा नदीत सोडण्यात आलाय. त्यामुळे नदीच्या कडेला असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात पाणी शिरलं आहे.
मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेला राज्य महामार्ग पाण्याखाली गेलाय. या महामार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. हा कल्याण कर्जत राज्य महामार्गावर असून या महामार्गावरून दररोज शेकडो वाहन ये जा करत असतात. उल्हास नदी ओव्हर फ्लो झाल्यामुळे काजगाव जवळ हा महामार्ग बंद झालाय.
रायगडच्या रोहा रोह्यात कुंडलिका नदीला आलेल्या पुराच पाणी शिरल असून या मुळे रोहा शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. शहरातील भुनेश्वर, वरसे, आदर्श नगर, वैभव नगर भागातील रस्ता आणि घरांमध्ये पुराच पाणी शिरलं आहे.
मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्यामुळे वाहतुकीला धोका. शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
वाहतूक बंद झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर.
मुसळधार पावसामुळे गावात जाणारा रस्ता साडेतीन ते चार फूट खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीती.
आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून रस्ते, पूल आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुणे नाशिक महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या पुराचा सर्वात मोठा फटका औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांना बसतोय.रस्त्यावरील भीषण ट्रॅफिक जॅममुळे कंपन्यांच्या बसेस अडकून पडल्या आहेत आणि कामावर निघालेले कामगार तासनतास रस्त्यावरच ताटकळत उभे आहेत.
तपोवन परिसरात सुरू असलेल्या कामासाठी उभारण्यात आले होते शेडचे ऑफिस
पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे शेड गेले वाहून
नेरळ आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान पाणी साचल्यामुळे खालील मेल/एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी NTES ॲप वर संबंधित गाड्यांचे सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असं आवाहन कऱण्यात आलंय.
नेरळ परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस
कर्जत-कल्याण राज्य महामार्गावरची वाहतूक मंदावली
उल्हास नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ
नाशिक -
- नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दोबाडेवाडीला जोडणारा नवीन पूल पाण्यात गेला वाहून
- या पुलाचे नव्यानेच झाला होता काम
- कालपासून सुरू आहे त्र्यंबकेश्वर आणि परिसरात मुसळधार पाऊस
नाशिक -
- गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ
- मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळी झपाट्याने होतेय वाढ
- दूतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलो गोदावरीच्या पुराचे पाणी
- गोदा घाट परिसरातील पूर परिस्थिती वाढू लागली
नाशिक -
- वडाळा परिसरात सखल भागात पाणी साचलं
- काही नागरिकांच्या घरात देखील शिरलं पावसाचं पाणी
- प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याचा आरोप
नाशिकच्या येवला तालुक्यातील मुळूबाईच्या घाटात दुधाचा टँकर ब्रेक फेल होऊन टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे
नांदगाव-येवला राज्यक्रमांक 25 वर ही घटना घडली असून,दुधाने भरलेला टँकर नांदगाव कडून येवला येथे येत असताना मुलुबाईच्या घाटात वळणावर टँकरचे ब्रेक न लागल्याने टँकर कठडे तोडून खाली कोसळला यात टँकरचे मोठे नुकसान झाले
टँकर हा दुधाने भरलेला असल्याने संपूर्ण दूध हे शेतात वाहून गेले,यात टँकर चालक जखमी झाला असून त्याच्यावर येवला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे,
कणकवलीतील घोणसरीचा मनमोहक धबधबा झाला प्रवाहित
निसर्गाने कोकणात मुक्त हस्ताने उधळण केलीय.
पावसाळ्यात तर कोकणाचे सौदर्य अजूनच खुलतं
डोंगर दऱ्यातून खळखळत वाहणारे नयनरम्य धबधबे
डोंगररागांत आलेले धुके व पाऊस यामुळे कोकणातील वातावरण आल्हाददायक बनलेले असते.
उत्तर पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा कायम आहे.
आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मोठी दरड कोसळल्याने मंचर-भीमाशंकर मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
सतत पाऊस सुरू असल्याने आणखी दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांनी आणि नागरिकांनी या मार्गाने प्रवास टाळावा.
पुणे
एकता नगरी एका सोसायटीत पाणी घुसले
शिवणे भागातही काही घरात पाणी घुसले
उल्हासनगर -
मध्य रेल्वे अनिश्चित वेळाने चालत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवासाची गर्दी
रेल्वे स्थानकावरील इंडिकेटर बंद ठेवण्यात आले
तसेच आज उल्हासनगर ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस
पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच ढगांचा कडकडाट विजयचा गडगडात शहरवासींना ऐकायला मिळतोय
आज अंबरनाथ उल्हासनगर शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
पहाटेपासून ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाच्या सरी
पुणे -
खंडणी प्रकरणात बिश्नोई टोळीतील तिघांना राजस्थानमधून अटक
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची राजस्थान मध्ये जाऊन कारवाई
तीन जणांकडून तीन गावठी पिस्तूल आणि ३० जिवंत काडतुसे जप्त
फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांच्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर गोळीबार करण्यात आला होता
अहिल्यानगर -
अहिल्यानगर जिल्ह्याला आजही यलो अलर्ट
जिह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
दोन दिवसांपासून पावसाची संततधार
तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ
भंडारदरा 50% , मुळा 40 तर निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा
खरिप पेरणीला मिळणार मुहूर्त
गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या
अमरावती जिल्ह्यात 75 टक्के पेरण्या पूर्ण
अमरावती मध्ये दोन दिवसात केवळ सात मिलिमीटर पावसाची नोंद
ऑरेंज अलर्टचा इशारा मात्र पाऊस बेपत्ता
ठाण्यात मागील १२ तासांत ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली
पडणार्या पावसामुळे ठाण्यातील वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी साचले
ठाण्यात मागील एक तासांत २० मिलिमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली
आज देखील पावसाची संततधार सुरूच राहणार
शहापूर -
आसनगाव - आटगाव दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
रेल्वे सेवा विस्कळित
कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प
चाकणमध्ये पावसाचा फटका; पुणे-नाशिक महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडी
मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून चाकण-तळेगाव मार्गासह संपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
पुणे -
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27303 क्युसेक पाण्याचा विसर्ग
नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट
प्रशासकीय यंत्रणा तैनात
पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज देखील पावसाचा अलर्ट
कोल्हापूर -
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फूट 5 इंचावर
(पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट आहे तर धोका पातळी 43 फूट आहे)
60 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत
पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू
कोल्हापूरच्या पंचगंगेची वाटचाल संथ गतीने इशारा पातळीकडे सुरूच
कोल्हापुरात पावसाची उघडझाप तर पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम
राधानगरी, दूधगंगा धरणांसह जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मुसळधार पाऊस
नाशिक -
- सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस
- सुरगाणा तालुक्यातील उंबरदे जवळील नार नदीला पूर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पुन्हा सकाळपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे.
हलकासा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.
कालही सकाळचा अर्धा दिवस असाच पाऊस झाला होता.
मात्र मोठा दमदार पाऊस होत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता कमी होत नाही.
या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळालाय.
पुणे -
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27303 क्युसेक पाण्याचा विसर्ग
नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट
प्रशासकीय यंत्रणा तैनात
पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज देखील पावसाचा अलर्ट
पुणे -
मंचर- भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी घोडेगावपासून पुढे बंद
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे वाहतूक बंद
मंचर- भिमाशंकर रस्त्यावर घोडेगाव ते डिंभे दरम्यान काही ठिकाणी पाणी साचले
डिंभे येथील वाय पॉईंट कडून भीमाशंकरकडे जाताना पोखरी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या धबधब्यांच्या परिसरात पाण्यासोबत माती , दगड रस्त्यावर वाहून आले
मंचर- भीमाशंकर रस्ता घोडेगाव पासून पुढे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुणे -
पुण्यात रात्री पावसाची जोरदार बॅटिंग
पुणे शहरातील अनेक भागांमध्ये झाडं कोसळल्याच्या घटना
पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात जुने वृक्ष कोसळल्याची घटना
काल मध्यराञी शहरात शिवाजीनगर व जंगली महाराज रस्त्यावर मोठी झाडे कोसळली असून अग्निशमन दलाकडून झाड हटविण्याचे काम अद्याप सुरु
सुदैवाने घटनेत कोणीही जखमी नाही
नाशिक -
- नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट
- सकाळी ७ वाजल्यापासून पुढील ३ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
- रात्रीपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर
- दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी
- प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
यवतमाळ -
पिक कर्ज अडविणाऱ्या बँक व्यवस्थापकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
सिबिलचा कारणावरून शेतकऱ्याचे कर्ज नाकारणाऱ्या बँकांना नोटीस
खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्याचे आदेश असताना जिल्ह्यातील काही राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल खराब असल्याचे कारण देत कर्ज देण्यास नाकार दिला.
या प्रकरणातील काही तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गंभीर दाखल घेतली
बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित शाखांना नोटीस बजावली आहे.
नाशिक -
- नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरात पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी कोसळली
- रस्त्यालगत उभ्या असलेल्या चारचाकीवर फांदी पडल्याने वाहनाचे नुकसान
- सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
- पावसामुळे झाडांच्या फांद्या धोकादायक, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
नाशिक -
- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांना पावसाचा अलर्ट
- जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
- प्रशासनाकडून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळांना आज सुट्टी जाहीर
- जिल्ह्यातील गड,किल्ले, पर्यटनस्थळांवर देखील पर्यटकांना बंदी कायम
- त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं मात्र सप्तशृंगी देवींचं मंदिर ९ जुलैपर्यंत बंदच राहणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.