Maharashtra News Live Update: पुण्यातील घोरपडी भागात एक मोठं झाड ७ ते ८ घरांवर कोसळलं

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, पिंपरी-चिंचवड पावसाचा रेड अलर्ट, राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv
Published On

पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट रस्ता वाहतुकीसाठी महिनाभर बंद राहणार

दरड कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय

० रायगडच जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आदेश

० अतिवृष्टीमुळे घाटमार्गावर सातत्याने कोसळणाऱ्या दरडींचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाची खबरदारी

० मागील 15 दिवसात तीन वेळा दरडी कोसळून वाहतूक झाली होती ठप्प

पुण्यातील घोरपडी भागात एक मोठं झाड ७ ते ८ घरांवर कोसळलं

पुण्यातील घोरपडी भागात एक मोठं वृक्ष ७ ते ८ घरांवर कोसळले

घोरपडी गाव या ठिकाणी मोठे पिंपळाचे झाड सात ते आठ घरावरती पडून मोठे नुकसान

यघतनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचे काम सुरू

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वरंधा घाट ३१ ऑगस्टपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वरंधा घाट रस्ता ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडीवरील राजेवाडी–वरंधा–भोर–महाड मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ताम्हिणी घाट, तर कोल्हापूरकडे जाणाऱ्यांसाठी महाबळेश्वर–वाई–सातारा किंवा खेड–चिपळूण–पाटण–कराड मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा; झांजरोळीतील २०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. झांजरोळी येथील चार पाड्यांतील सुमारे २०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून मंडल पाड्यातील ४५ जणांचेही एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पालघरच्या पश्चिम भागात अजूनही पावसाचा जोर कायम असून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

वारणा नदीच्या पुराचा तडाखा; मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा रस्ता वाहून गेला

सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. विशेषतः मांगले बाजूचा साईड रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून मांगले आणि सावर्डे परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

औंढे येथे विहिरीत पडलेल्या गाईचे ग्रामस्थांनी वाचवले प्राण 

खेड तालुक्यातील औंढे आंबोली गावात विहिरीत पडलेल्या गाईला ग्रामस्थांनी तत्परता दाखवत सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे गाईचे प्राण वाचले.

आळंदी मुख्य मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

आळंदी मुख्य मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

इंद्रायणी नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या पुलावर पाण्यामुळे रस्ता बंद

पोलिसांकडून वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा आवाहन

इंद्रायणी नदीवरून जाणाऱ्या पुलावर चहू बाजूने पाणीच पाणी

लेंडी धरणातील घळभरणीच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, ठाकरे सेनेची मागणी 

लेंडी धरणातील घळभरणीच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम करत असल्याच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेच्या वतीने हलगी बजाव आंदोलन करण्यात आले.या प्रकल्पाच्या कामाची चौकशी करून दोषी अधिकारी तत्कालीन कार्यकारी अभियंता चौगुले व उप अभियंता जाधव यांची व सुजाता कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे सेनेने केली आहे.

TET प्रकरणातील 4 ही आरोपींना 18 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी 

TET पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या आणि भिवंडी न्यायालयाने 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेल्या 4 आरोपीला आज भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस एम सुतार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते या 4 ही आरोपींना न्यायालयाने 18 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बदलापुरात उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ

बदलापुरात उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालीय. धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पुराचं पाणी मुख्य रस्त्याच्या दिशेनं सरकू लागलय. उल्हास नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं पालिकेत तातडीची बैठक बोलावली होती.

येणवे-बुरसेवाडीत मुसळधार पावसाचा फटका; रस्ते जलमय, भातशेती धोक्यात 

खेड तालुक्यातील येणवे-बुरसेवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पालघरमध्ये मुसळधार पावसाचा कहर! झांजरोळी धरणाचा भाग वाहून गेला, ग्रामस्थांमध्ये भीती

पालघर जिल्ह्याला आज पावसाने चांगलं झोडपून काढलं असून पश्चिम किनारपट्टी सह परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे . केळवेसह परिसराला पाणीपुरवठा करणार झांजरोळी धरणाचा काही भाग पहाटे सात वाजताच्या सुमारास पावसाच्या पाण्यासह वाहून गेल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे .

डोंबिवलीत कैलास लस्सी स्वीट मार्टच्या किचनला आग, कर्मचाऱ्यांनी केली स्वतःची खिडकीतून सुटका

डोंबिवली पूर्वेतील कैलास लस्सी स्वीट मार्टच्या पहिल्या मजल्यावरील किचनमध्ये सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागताच तेथे काम करणाऱ्या सात ते आठ कर्मचाऱ्यांनी खिडकीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला.

भंडाऱ्यात ओबीसींचे भीक मांगो आंदोलन

भंडाऱ्यात ओबीसींचे भीक मांगो आंदोलन

ओबीसी विद्यार्थ्यांच्या निधी कपातीचा केला निषेध

आळंदी आणि देहू मध्ये न जाता पुण्यातून पालखीमध्ये सहभागी व्हा, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

आळंदी आणि देहू मध्ये न जाता पुण्यातून पालखीमध्ये सहभागी व्हा, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

देव आणि आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जिल्हा प्रशासनाचे भाविकांना आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पालखीच्या नियोजनाबाबत दिले आहेत निर्देश

संयम बाळगून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन

पुणे-नाशिक महामार्ग ८ तासांपासून ठप्प; १० किमी वाहनांच्या रांगा


मुसळधार पावसामुळे चाकणजवळील वाकी येथे ओढ्याचे पाणी पुणे-नाशिक महामार्गावर आल्याने गेल्या आठ तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

दोन्ही बाजूंना सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुणे शहरातील पोलीस मुख्यालयात पाणी भरलं

पुणे शहरातील पोलीस मुख्यालयात पाणी भरलं

सुमारे दोन ते तीन फूट पाणी असल्याने पोलिसांचे हाल

जोरदार पावसामुळे मुख्यालयात पाणी

पाणी काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

पूरपरिस्थितीत अडकलेल्या आळंदी येथील भाविकांची सुरक्षित सुटका

पूरपरिस्थितीत अडकलेल्या आळंदी येथील भाविकांची सुरक्षित सुटका

प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

एकूण ४०८ भाविकांची सुटका

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

भांडुप ते नाहूरदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत

भर पावसात निवृत्तीनाथांच्या पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण

त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे..

पालखी सोबतच वरून राजाचे देखील अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार आगमन झालयं.. कोसळणारा पाऊस आणि विठू नामाच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, असं चित्र अहिल्यानगरच्या रस्त्यांवर दिसून येतयं..

भर पावसातही विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन हजारो वारकरी पंढरीच्या दिशेन निघाले आहेत..

पुण्यात मुसळधार पावसाची बॅटिंग

पुण्यात मुसळधार पावसाची बॅटिंग

मुसळधार पावसामुळे पुणे पोलिस मुख्यालयात शिरले पाणी

पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या पोलिस मुख्यालयात गुडघाभर पाणी

पोलिस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराला ओढ्याचे स्वरूप

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिकात्मक आंदोलन

ठाण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याचे प्रमाण वाढले असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन

पडलेल्या झाडाच्या फांद्या अंगावर घेत महेश कदम यांनी नाट्यमय आंदोलन केले .

ठाकरे गटाचे महानगर संघटक महेश कदम जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि इतर पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित

पावसाळ्याआधी वृक्ष छाटणी न केल्याने आपत्ती उद्भवली असून महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Thane : ठाण्यात झाडाची फांदी कोसळल्याने व्यक्ती गंभीर

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील हुजुरी परिसरात परिवहन कार्यालय समोर झाडची फांदी कोसळल्याने व्यक्तीला गंभीर स्वरूपात दुखापत झाली आहे..

सदर व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे...

हवामान विभागाच्या माध्यमातून आज ही ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे..

ठाण्यात झाड पडून दुर्घटना मध्ये कमतरता दिसून येत नाही..

सिंहगड घाट परिसर रेड अलर्टमुळे नागरिक व पर्यटकांसाठी आज उद्या बंद

अतिमुसळधार पावसाचा इशारा सुरक्षिततेसाठी वनविभागाचा निर्णय, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आज सोमवार ६ व ७ जुलै मंगळवारी रोजी रेड अलर्ट जारी करत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांचा प्रवेश आज सोमवार ६ व ७ जुलै मंगळवारी रोजी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय पुणे वनविभागाने घेतला आहे.

उल्हास नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ

मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहतीय. वांगणी जवळील कुडसावरे पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वांगणीहून कान्होर, काराव, इंदगावकडे जाणारा मार्ग बंद झालाय. हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहनचालकांनी आणि रहिवाशांनी कोणतंही धाडस करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलय.

वारकऱ्यांना आळंदी प्रवास न करण्याचे आवाहन

सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही.

ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.

पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या ४ एसटी बसेस 'उर्से टोल नाका' परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले आहे. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये.

साताऱ्यात सुसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि सुसाट वाऱ्याने थैमान घातले आहे. या पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका सज्जनगडच्या पायथ्याला असणाऱ्या सातारा तालुक्यातील कारी गावाला बसला आहे. कारी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारतीचे पत्र्याचे छप्पर कोसळले आहे.

मावळमध्ये एनडीआरएफची धाडसी कारवाई; पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका

घोरावाडी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने एक खासगी बस अडकून पडली होती. माहिती मिळताच पुणे येथील एनडीआरएफच्या ०५ बटालियनच्या टीम 5HQR ने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या कारवाईत बसमध्ये अडकलेल्या सर्व ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने; मुसळधार पावसाचा फटका

कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम कोकण रेल्वेवर होताना पाहायला मिळतोय. मुंबईवरून कोकणात येणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या उशिरा धावत आहेत. तुतारी एक्सप्रेस दोन तास उशिराने धावत आहे. मंगलरूएक्सप्रेस चार तास, तर कोकण कन्या एक्सप्रेस आणि पुणे एरणाकुलम साडेतीन तास उशिराने धावत आहे.

मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी

- विधानसभेचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे; या घटनेचा कामकाजावर परिणाम होऊ नये.

- अनेक आमदार विमानतळावरून थेट विधानसभेत पोहोचू शकतात, त्यामुळे उपस्थितीत मोठी अडचण येणार नाही.

- मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले असले तरी विधानभवनात पोहोचणे शक्य आहे.

- कामकाजासाठी अनेक आमदारांचे प्रश्न सूचीबद्ध असून ते महत्त्वाचे आहेत.

- विधानसभेचे कामकाज स्थगित करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांकडे असतो

Badlapur: बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली

बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली

उल्हास नदीच्या पाण्याची पातळी 17.50 मीटरवर

बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज

12 हजार लोकांच्या निवासाची व्यवस्था

Bhiwandi_  भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर काय

भिवंडी -

भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम

सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात

शहरातील भाजी मार्केट परिसरात असलेल्या भाजी विक्रेत्यांनी आपले भाजी पाला दुसऱ्या स्थानी स्थलांतर करण्यात आला आहे.

काही दुकान पाणी खाली गेल्याने बंद ठेवण्यात आली आहेत.

Satara: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस

सातारा -

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस

मेढा महाबळेश्वर रस्त्यावरील केळकर घाटात दरड कोसळली...

साताराहून महाबळेश्वर कडे जाणारा रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक झाली बंद...

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मेढा पोलीस दरड हटवण्याच्या सूचना

Badlapur: बदलापुरात उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली

बदलापुरात उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली

उल्हास नदीच्या पाण्याची पातळी 17.10 मीटरवर

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उल्हास नदीवर बदलापूरकरांनी गर्दी करू नये प्रशासनाचं आवाहन

Rain Alert: मुंबई, पुणे परिसरात पुढील 2 दिवस रेड अलर्ट

पुणे -

मुंबई,पुणे परिसरात पुढील दोन दिवस रेड अलर्ट

कोकण किनारपट्टी,पुणे,मुंबई घाटमाथ्यावर रेड अलर्ट

पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पुढील २ दिवस रेड अलर्ट तर शहरात येलो अलर्ट

अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

नागरिकांनी काळजी घेण्याचं हवामान विभागाचे आवहान

हवामान विभागाची माहिती..

Aalandi: आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय, चारही पूल गेले पाण्याखाली

आळंदी -

आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे

चारही पूल पाण्याखाली गेले आहे

पूल पाण्याखाली गेले असल्यामुळे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली

कोणीही इंद्रायणी नदीच्या पात्रालगत येऊ नये असं आवाहन नगरपरिषदेकडून नागरिकांना आणि वारकऱ्यांना करण्यात आलं आहे

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट

नद्यांच्या पातळीमध्ये कमालीची वाढ कायम

खेडमधील जगबुडी धोक्याच्या पातळीवर, चिपळूणची वाशिष्टी इशारा पातळी जवळ

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी

जगबुडीची पाणी पातळी होते कमी मात्र बाजारपेठेत अद्यापही पाणी

काजळी नदी सध्या दुथडी भरून, आज दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा

सकाळपासून मात्र पावसाचा जोर थोड्याफार प्रमाणात ओसरला

गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस

गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 156 मिलिमीटर इतका पाऊस

उत्तर रत्नागिरीला पावसाने अक्षरशहा जोडपून काढलं

कशेडी घाटा दरम्यान दरड कोसळल्यानं महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प

दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर

Pune: पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल

पुण्यासह मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमधून अनेक बस मुंबईच्या दिशेने येत असतात

मात्र रात्रीच्या सुमारास मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने पूर्ण वाहतूक बंद करण्यात आले आहे.

Ratnagiri: रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे पुन्हा दरड कोसळली

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे पुन्हा दरड कोसळली

वेरळ घाटात दरड कोसळण्याची ही चौथी घटना आहे

सध्या एक लेन सुरू करण्यात आलेली आहे

Raigad: रायगडमध्ये पावसाचा जोर कायम, मुंबई- गोवा महामार्गावर साचलेल्या पाण्यात बस अडकली

- रायगडमध्ये पावसाचा जोर कायम

- मुंबई- गोवा महामार्गावर साचलेल्या पाण्यात बस अडकली

- महाड ताम्हिणी घाट मार्गे पुणे रस्ता बंद

Ratnagiri: चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

रत्नागिरी - चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

चिपळूण बाजारपेठ मधील मच्छी मार्केट परिसरात पुराच पाणी

मच्छी मार्केट परिसर जलमय, मार्ग वाहतुकीसाठी बंद

आजूबाजूच्या परिसरातही पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

पाणी साचल्यामुळे मच्छी मार्केटकडे जाणारा मार्ग प्रशासनाने वाहतुकीसाठी केला बंद

Pune: पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

पुणे-

पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा निर्णय

जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com