मुंबईचे उपमहापौरपद शिवसेनेकडे, शिंदेंनी 'या' नेत्यांकडे दिली जबाबदारी

Shiv Sena Wins Mumbai Deputy Mayor Post: मुंबई महापालिकेच्या उपमहापौरपदाची जबाबदारी शिंदे गटाच्या शिवसेनेकडे आली असून संजय घाडी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
Sanjay Ghadi after being announced as Mumbai’s Deputy Mayor from Shiv Sena (Shinde faction)
Sanjay Ghadi after being announced as Mumbai’s Deputy Mayor from Shiv Sena (Shinde faction)Saam tv
Published On

मुंबई उपमहापौरपद शिंदे गटाच्या शिवसेनेकडे

संजय घाडी यांच्या नावाची अधिकृत घोषणा

बीएमसीतील राजकीय समीकरणांना नवे वळण

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला आणखी बळ

मुंबई महापालिकेतील सत्ता संतुलनात बदल

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या उपमहापौरपदाची आज घोषणा झाली असून मुंबईचे महापौर हा भाजपचा आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय घाडी हे उपमहापौर तर भाजपचे रितू तावडे हे महापौर असण्याची शक्यता आहे. महापलिका निवडणूक होऊन अनेक दिवस उलटले होते. मात्र मुंबई महापौरपदाचा सस्पेन्स कायम होता. वेगवेगळी नावे चर्चेत असताना आता या सगळ्याला विराम लागला आहे.

Sanjay Ghadi after being announced as Mumbai’s Deputy Mayor from Shiv Sena (Shinde faction)
Crime News : 'माझी ईच्छा पूर्ण कर' नोकरीच्या बदल्यात नको ते मागितलं, माजी सैनिकाच्या मुलीसोबत भयंकर घडलं!

या निवडीसाठी पालिकेचे ऐतिहासिक महापौर दालन आता पूर्णपणे सुसज्ज झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सव्वावर्षासाठी घाडी हे उपमहापौर असणार आहेत. यावेळी शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित आहे. तर दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहे.

Sanjay Ghadi after being announced as Mumbai’s Deputy Mayor from Shiv Sena (Shinde faction)
Police Bharti: तयारीला लागा! पोलिस भरतीची तारीख ठरली; या दिवशी होणार मैदानी चाचणी

सकाळपासूनच पक्षकार्यालयात खलबतं

आज सकाळी महापालिकेतील मुख्यालयामध्ये भाजप आणि शिंदेसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत सत्तेचे शेवटचे समीकरण आणि विविध पदांच्या वाटपावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी या बैठकीत भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश खाणकर उपस्थित आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, गटनेते अमेय घोले उपस्थित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com