Crime News : 'माझी ईच्छा पूर्ण कर' नोकरीच्या बदल्यात नको ते मागितलं, माजी सैनिकाच्या मुलीसोबत भयंकर घडलं!

Washim Crime News : वाशिममध्ये माजी सैनिकाच्या मुलीचा मानसिक व लैंगिक छळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या सुपरवायझरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे.
Crime News : 'माझी ईच्छा पूर्ण कर' नोकरीच्या बदल्यात नको ते मागितलं, माजी सैनिकाच्या मुलीसोबत भयंकर घडलं!
Washim Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • माजी सैनिकाच्या मुलीचा नोकरीच्या नावाखाली मानसिक व लैंगिक छळ

  • पैसे न दिल्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप

  • महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचा सुपरवायझर आरोपी

  • वाशिम शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

मनोज जैस्वाल, वाशिम

वाशिममध्ये एका माजी सैनिकाच्या मुलीचा मानसिक छळ करून तिच्याकडे शरीरसुखाची आणि पैशांची मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे ही मागणी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या सुपरवायझरने केली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी माजी सैनिकाच्या मुलीने तक्रार दाखल केली आहे. वाशिम शहर पोलीस ठाण्यात सुपरवायझर विरोधात विनायभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश पिंपळकर असं या सुपरवायझरचं नाव असून या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तक्रारदार मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती माजी सैनिकाची मुलगी असून महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडं तिनं नोकरी साठी अर्ज केला होता. सर्व कागदपत्र आणि पात्रता असूनही वारंवार त्या कागदपत्रात त्रुटी काढून तिचा मानसिक छळ केला आणि त्रुटी पूर्ण केल्यावर ४० हजार रुपयांची मागणी केली.

Crime News : 'माझी ईच्छा पूर्ण कर' नोकरीच्या बदल्यात नको ते मागितलं, माजी सैनिकाच्या मुलीसोबत भयंकर घडलं!
KDMC News : अरेरे! कल्याण डोंबिवली महापौर बंगल्याची वाईट अवस्था; केडीएमसीच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या करोडो रुपयांची उधळपट्टी

मात्र पैसे देण्यास नकार दिल्यावर संबंधित सुपरवायझरने 'तु पैसे नको देऊ, मात्र माझी ईच्छा पूर्ण कर' अशी मागणी केली. शिवाय 'तु काही १५, १६ वर्षाची नाहीस, मला काय म्हणायचे समजून घे. सीमेवर असतांना आम्हाला शरीसुख मिळाले नाही. आताही मी घरापासून दूर राहतो. तुलाही शरीर सुखाची गरज असेल' असे अश्लील संभाषण केलं. या तरुणीने या आधीही महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि वाशिम जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

Crime News : 'माझी ईच्छा पूर्ण कर' नोकरीच्या बदल्यात नको ते मागितलं, माजी सैनिकाच्या मुलीसोबत भयंकर घडलं!
Crime news : बंद खोलीत ३८ महिला आणि ४३ पुरुष, पोलिसांची धाड पडली, धक्कादायक प्रकार उघड; ८१ जण सापडले कचाट्यात

या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी सतीश पिंपळकर आणि अन्य लोकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ७५(२) (विनयभंग/लैंगिक छळ) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर श्रीरंग नाईकवाडे हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com