Accident News: मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Palghar Car Accident: पालघरमध्ये मुंबई- अहमदाबाद महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील सर्वजण मुंबईला येत होते.
Accident News: मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू
Palghar Accident Saam Tv
Published On

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात भीषण अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणार्या भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधल तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे.

Accident News: मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू
Palghar: आधी डोकं आपटलं नंतर गळा आवळून संपवलं, मुलाच्या हत्येनंतर बापानेही गळफास घेतला; पालघरमध्ये खळबळ

अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. पालघरच्या मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचा तपास मनोर पोलिसांकडून सुरू आहे. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावं अद्याप समोर आली नाहीत.

Accident News: मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू
Palghar News : पालघरमधील रिसॉर्टमध्ये गर्लफ्रेंडवर गोळीबार; प्रकरणाला नवं वळण; 'ती' गोळी बॉयफ्रेंडनं नव्हे तर...

ग्लोरिया वैलेस (७३ वर्षे - महिला) क्लेटन वैलेस (४३ वर्षे - पुरुष), फैबियोला वैलेस (४५ वर्षे - महिला) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. जखमीमध्ये लहान चिमुकल्याचा समावेश आहे. जखमींवर मनोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिस घटनास्थळी असून तपास करत आहेत. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग बनला असून दिवसेंदिवस या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

Accident News: मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू
Accident News: उभ्या डंपरला कारची धडक; २ जण जागीच ठार, ६ जण जखमी, २ वर्षांच्या चिमुकल्यानेही सोडले प्राण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com