Pune News
Pune News Saam Tv

Pune : चुकीच्या औषधामुळे रुग्णाचा मृत्यू, गुपचूप ससून रुग्णालयात नेलं अन्... कुटुंबाचा खळबळजनक आरोप

Pune News : पौंड येथील ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. चुकीच्या औषधांमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
Published on

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातील पौंड येथील ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. चुकीचे औषध दिल्याने रुग्णाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर पेरणीकर या रुग्णाचा १९ मे रोजी ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला होता. चुकीचे औषध दिल्याने रुग्णाची तब्येत खालावली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना न सांगता रुग्णाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Pune News
Kalyan Bogus Doctor : डॉक्टर असल्याचा बनाव, तरीही रुग्णांवर उपचार, दोघांवर पालिकेची कारवाई; कल्याणमध्ये खळबळ

ज्या डॉक्टरांमुळे रुग्णाचा मृत्यू झाला, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. जो पर्यंत रुग्णाचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तेराव्याचा विधी करणार नाही अशी नातेवाईकांची भूमिका आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune News
मुंबई इंडियन्सला दुहेरी धक्का! Eliminator Match पूर्वी दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त? Video मुळे वाढलं टेन्शन

पौंड येथील ग्रामीण रुग्णालयात शंकर पेरणीकर या रुग्णाचा १९ मे रोजी मृत्यू झाला. चुकीचे औषध दिल्याने रुग्णाची तब्येत बिघडली. आम्हाला न कळवता रुग्णाला ससून रुग्णालयात हलवण्यात आल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही मरणोत्तर विधी करणार नाही असे रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

Pune News
Mumbai Indians : ...तर मुंबई इंडियन्स बाहेर जाईल! IPL चा नियम ठरणार कर्दनकाळ, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com