साखर झोपेत असताना काळाचा घाला! मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू

Mumbai Agra Highway Triple Accident Dhule Today: धुळे येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात भीषण तिहेरी अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू, तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहे.
farmer crying in front of bjp mla in latur  - 2026-05-25T080525.342.jpg
farmer crying in front of bjp mla in latur - 2026-05-25T080525.342.jpgsaam tv
Published On

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला असून यामध्ये 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहे. याठिकाणी एक रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये जोरदार धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

farmer crying in front of bjp mla in latur  - 2026-05-25T080525.342.jpg
Accident : आंबेनळी घाटात घाटात स्कॉर्पिओ १८०० फूट दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; नावं आली समोर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लळिंग घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. घाटातून जात असताना एका वेगवान डंपरने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्याच वेळी पाठीमागून येणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स बस देखील या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन आदळली. तीनही वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने महामार्गावर एकच आक्रोश निर्माण झाला.

farmer crying in front of bjp mla in latur  - 2026-05-25T080525.342.jpg
Kalyan Crime: कल्याणमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला, २ तरुणांकडून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील 5 ते 6 जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे, जेणेकरून वाहतूक पूर्ववत करता येईल. महामार्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com