MSRTC: परिवहन मंत्री अनिल परबांवर गुन्हा दाखल करा : एसटी कर्मचारी

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी आत्महत्या करु लागल्याने अन्य कर्मचा-यांचा सरकारवरील राेष वाढला आहे.
Anil Parab
Anil ParabSaam TV

नांदेड : मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नांदेडच्या (nanded) एका एसटी (msrtc) चालकाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेवरुन पुन्हा एकदा एसटी कर्मचा-यांनी राज्य शासन (maharashtra government) आणि परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदाेलन छेडले. (msrtc latest marathi news)

मुखेड तालुक्यातील येवती येथे गंगाधर मारोती येवतीकर यांनी साेमवारी आत्महत्या केली. ते एसटीत चालक म्हणून कार्यरत हाेते. गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही. गावाकडे केवळ २० गुंठे शेती. त्यातून ते कुटूंबाचा गाडा हाकत.

Anil Parab
World Cup: टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; यास्तिका, स्नेहची धडाकेबाज कामगिरी

अखेर आर्थिक विवंचनेतून गंगाधर येवतीकर यांनी रहात्या घरी आत्महत्या केली. दरम्यान मुखेड आगारातील एसटी कर्मचारी यांनी परिवहन मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल हाेत नाही ताेपर्यंत पाेलिस ठाण्यातून बाहेर पडणार नाही असा पवित्रा घेतला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

Anil Parab
Shimgotsava: ढाेल ताशांचा गजर; शिमगोत्सवात महिलांनी नाचवली पालखी
Anil Parab
Bavdhan Bagad: बाळासाहेब मांढरेंना मिळाला बगाड्याचा मान; बावधनला भाविकांची गर्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com