Shimgotsava In Ratnagiri
Shimgotsava In RatnagiriSaam Tv

Shimgotsava: ढाेल ताशांचा गजर; शिमगोत्सवात महिलांनी नाचवली पालखी

काेकणात शिमगाेत्सवास खूप महत्व असल्याने मुंबईतील चाकरमानी उत्सवासाठी गावी येत असतात.

रत्नागिरी : शिमगोत्सवातील (Shimgotsava) सर्व कार्यक्रम बहुतांश ठिकाणी पुरुष करतात. अगदी खेळ्यांमधील राध, कोळीणीचे कामही साडी नेसून, मेकअप करुन पुरुषच करतात. या संस्कृतीमध्ये महिलांनी (women) थेट पालखी (palkhi) खांद्यावर घेवून नाचवण्याचा आनंद लुटला आहे. (ratnagiri latest marathi news)

शिमगोत्सवातील कोणत्याच कार्यक्रमात महिलांचा थेट सहभाग नसतो. पालखीचे दर्शन आणि ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी महिला सहाणेवर येतात. गेल्या अनेक वर्षांपासून काेकणात (kokan) हेच चित्र पहायला मिळते.

Shimgotsava In Ratnagiri
Bribe: वाळू व्यावसायिकांची तक्रार; २५ हजार रूपयांच्या लाच प्रकरणी तलाठ्यास अटक

यंदा मात्र प्रथमच शिमगोत्सवातील पालखी महिलांनी नाचवली. त्यांचे ग्रामस्थांनी काैतुक देखील केले. ढाेल ताशांच्या निनादात पालखी नाचवताना महिलांना ग्रामस्थ पाठबळ देत हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Shimgotsava In Ratnagiri
Shivjayanti: अश्व दाैड स्पर्धेत अंबेजोगाई, बेलकुंड, परभणी, अहमदपूरकरांची बाजी
Shimgotsava In Ratnagiri
World Cup: टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; यास्तिका, स्नेहची धडाकेबाज कामगिरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com