MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

MPSC Student Protest: एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करत हे विद्यार्थी पुणे आणि कोल्हापुरात रस्त्यावर उतरले आहेत.
MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
MPSC Student ProtestSaam Tv News
Published On
  • पुणे आणि कोल्हापुरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

  • एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

  • एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

  • एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आठ प्रमुख मागण्या

  • एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकारावर विद्यार्थ्यांचा आक्रोश

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता स्पर्धा परीक्षेवरून विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. पेपरफुटीविरोधात पुणे, कोल्हापूरात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? राज्यात नेमकं काय घडतंय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

पाहिलीत ही बॅनर्स... दिल्लीतल्या जंतर-मंतरच्या जेन झी आंदोलनातली क्रिएटीव्हिटीची तुम्हाला नक्कीच आठवण झाली असेल. कारण याच धर्तीवर MPSC च्या विद्यार्थ्यांनी पेपरफुटीविरोधात आक्रोश मोर्चा काढला. पुणे आणि कोल्हापुरात हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी MPSC विरोधात रस्त्यावर उतरले.

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांनी ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढला. विशेष म्हणजे, या मोर्चात राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही सहभाग घेतला. तर दुसरीकडे, कोल्हापूरात MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी दसरा चौक परिसरात जोरदार निदर्शनं केली. या मोर्चातमोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झालेत. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

MPSCच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

- MPSC अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा घ्या, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नेमा

- गट-ब परीक्षेतील आक्षेपांवर 8 दिवसांत स्पष्टीकरण द्या

- राज्यसेवा मुख्य 2025 आणि कृषिसेवा परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी व्हावी

- मुंबई क्राईम ब्रँचनं MPSCला दिलेला प्राथमिक अहवाल सार्वजनिक करा

- आरोपींच्या पदोन्नती निकषांची सखोल चौकशी करा

- प्रवीण पाटील आणि मयूर ठाकरे व्यतिरिक्त इतर एजंट्सच्या सहभागाची सखोल चौकशी करा

- तिन्ही आरोपींच्या संपर्कातून निवडलेल्या उमेदवारांचे CDR तपासा

- स्टेनोग्राफीचं पद पुनर्जीवित करा

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
MPSC पेपरफुटीवर राजकारण तापलं, राहुल गांधी म्हणतात, 'MPSCवर भाजपचा ताबा'

खरंतर, MPSC सारखी घटनात्मक संस्था असताना राज्यात स्पर्धा परीक्षेत सातत्यानं गैरप्रकार समोर आलाय. MPSC नं घेतलेल्या भरती परीक्षांमधील गैरप्रकाराची प्रकरणे किती आहेत ते पाहूयात...

राज्य उत्पादन शुल्क विभाग उपनिरीक्षक भरती - 23 सप्टेंबर 2025

तलाठी भरती - 9 जून 2026

औषध निरीक्षक, गट-ब भरती - 26 ऑगस्ट 2026

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
MPSC पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत? झिरवळांच्या चौकशीची विरोधकांची मागणी

एकीकडे राज्यात विद्यार्थांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे, MPSC विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर दुसऱ्यांदा भेट घेतलीये. यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वसनही दिलंय. MPSC पेपरफुटी प्रकरणात कारवाई झाली नाही तर मुंबईत मोठं आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. त्यामुळे जंतर-मंतरवरील जेन-झी आंदोलनासारखंच नवं आंदोलन राज्यात निर्माण होताना दिसतंय. मात्र, त्याआधीच राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढणार का? MPSC भरती परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! नजर जाईल तिथपर्यंत तरुणांची गर्दी; सरकारसमोर थेट १० मागण्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com