MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai Police Arrest Rutuja Patil : MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने नंदुरबारमधून ऋतुजा पाटीलला अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर तिला मुंबईला नेण्यात येणार आहे.
Mumbai Police Arrest Rutuja Patil
MPSC paper leak case Rutuja Patil arrested in Nandurbarsaam tv
Published On

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. MPSC पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ऋतुजा पाटीलला अटक केलीय. ऋतुजा पाटीलला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांचे पथक आज सकाळपासून नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. पथकाकडून नंदुरबारातील विविध ठिकाणी झाडाझडती आणि चौकशी केल्यानंतर अखेर ऋतुजा पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी ऋतुजा पाटीलला घेऊन पथक मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Mumbai Police Arrest Rutuja Patil
MPSC Paper Leak Case: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेताच निघाला आरोपी

MPSC पेपरफुटी प्रकरणात प्रेमाचा अँगल असल्याचे सांगण्यात येत होते, त्याच प्रेमप्रकरणातून हा पेपर फुटल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, केवळ प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा हा प्रकार असल्याचे पेपरफुटी प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे यांनी म्हटलंय. दरम्यान तक्रार देणाऱ्या गौरव पाटील यांनाच पोलिसांनी अटक केल्याचंही त्याने सांगितलं. आता पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार प्रवीण पाटील याला अटक केल्यानंतर आपला मोर्चा नंदुरबारकडे वळवला.

Mumbai Police Arrest Rutuja Patil
सोलापूरकरांना मोठा दिलासा! जुना पुणे नाका-बोरामणी नाका उन्नत मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार

औषध निरीक्षक पदाच्या (FDA) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील यांना मुंबई पोलिसांच्या पथकाने प्राथमिक चौकशीनंतर ऋतुजा पाटील यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऋतुजा पाटील यांना त्यांच्या ज्ञानदीप सोसायटीतील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलीय.

त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणात मोठी कारवाई केली. मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीच्या (MPSC) तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली. औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांनाही अटक करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com