महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC सारख्या घटनात्मक संस्थेच्या कार्यपद्धतीवरून विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी अद्यापही ठाम असल्याचं दिसतंय. एव्हंढच नव्हे तर क्रॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेही MPSC विरोधात मैदानात उतरलेत. विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय.. मात्र नागपुरात MPSC विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिपकेंनी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी नवी रणनीती आखलीय. त्यांनी विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगितलं ते ऐका...
तर दुसरीकडे, विद्यार्थ्यांचा वाढता रोष पाहून MPSC मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. .या समितीनं MPSCच्या संपूर्ण यंत्रणेत बदल करण्याची गरज व्ही. राधा यांनी व्यक्त केलीय. दरम्यान, या समितीनं MPSC च्या कामकाजाची दिशाच स्पष्ट केलीये...
संपूर्ण MPSC यंत्रणेत बदलांची गरज
MPSC परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात सूचना प्राप्त झाल्यात. या सूचनांचा विचार केवळ प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्रांच्या व्यवस्थेपुरता मर्यादित न ठेवता आयोगाच्या अंतर्गत कार्यपद्धतीचाही सखोल अभ्यास केला जाणार आहे. अध्यक्ष, सचिव, परीक्षा नियंत्रक यंत्रणा तसेच जिल्हा पातळीवर परीक्षा घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीचा समावेश असणार आहे.
खरंतर, नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सीजेपीचे अभिजीत दिपकेंंनी स्कूल ठिक करो अभियानांतर्गत सरकारला धारेवर धरलंय. अशातच आता MPSC सारख्या घटनात्मक संस्थांच्या गैरव्यवहाराप्रकरणी आयोगाच्या अध्यक्षांकडे मोर्चा वळवलाय. अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशा आशयाचा व्हीडीओ थेट सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं आवाहन दिपकेंनी केलंय. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनंतर आता दिपके MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेणार का?... हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.