Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, पुढचे ४८ तास महत्वाचे; १९ राज्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. पुढचे ४८ तास हे महत्वाचे असणार आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ राज्यांना अलर्ट देण्यात आला.
Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, पुढचे ४८ तास महत्वाचे; १९ राज्यांना अलर्ट
Maharashtra Today Weather NewsSaam Tv
Published On
  • मान्सूनची आगेकूच सुरू

  • पुढील ४८ तास महत्वाचे

  • अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता

  • वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

  • १९ राज्यांना पावसाचा अलर्ट

उकाड्याने हैराण झालेले देशभरातील नागरिक पावसाची वाट पाहत आहेत. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात वेळेमध्ये दाखल झाला. मान्सून दाखल होताच हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पुढचे ४८ तास महत्वाचे असणार आहे. १९ राज्यांमध्ये वादळ वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरपासून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतापर्यंत पाऊसाचा जोर पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकरत असून लवकरच तो मुंबईत पोहचेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, पुढचे ४८ तास महत्वाचे; १९ राज्यांना अलर्ट
Maharashtra Monsoon : खुशखबर! कोकणात मान्सून दाखल; 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत मान्सून वेगाने पुढे सरकेल आणि अनेक राज्यांमध्ये पसरेल. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. ज्यांचा उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतावर थेट परिणाम होईल. सध्या देशाच्या विविध भागांमध्ये चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे हवामान अत्यंत अस्थिर झाले आहे. काही ठिकाणी कडक उन्हापाठोपाठ अचानक पाऊस येतो तर इतर ठिकाणी वादळे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे.

Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, पुढचे ४८ तास महत्वाचे; १९ राज्यांना अलर्ट
Monsoon Update : मान्सून कोकणात आला, पण राज्यभर पोहोचायला अडथळा; सरकारनं दिला महत्त्वाचा इशारा

पुढचे दोन ते तीन दिवसांत मान्सून हळूहळू पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो छत्तीसगड, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पोहोचू शकतो. अनेक भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे झाडे उन्मळून पडण्याचा आणि वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, पुढचे ४८ तास महत्वाचे; १९ राज्यांना अलर्ट
Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com