नर्सची निर्घृण हत्या, विहिरीत आढळला मृतदेह; त्या 'कॉल'ने बिंग फुटलं अन् प्रियकरानेही उचलले टोकाचं पाऊल

Missing Woman Found Dead In Well After 24 Days In Nashik: नाशिकच्या निफाडमध्ये २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपीने कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
nashik news
nashik newsSaam tv
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक प्रेम संबंध आणि पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रंभाबाई आनंदा काळे (वय ६०, रा. मामलेदार चौक, निफाड) या स्थानिक रुग्णालयात काम करत होत्या. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी २४ फेब्रुवारी रोजी निफाड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तपासा दरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल सीडीआरच्या आधारे संशयित अरुण बाजीराव ढेपले (वय ४५) याला ताब्यात घेतले.

nashik news
Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! ३ जणांवर तलवारीने सपासप वार, NCP नेत्याच्या पुतण्याला अटक

चौकशीत त्याने महिलेचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवून रविवारी सायंकाळी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला दरम्यान, संशयिताने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव करत आहेत.

nashik news
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी काढली अशोक खरातची वरात, पाहा VIDEO

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, रंभाबाई कांबळे या निफाडच्या एका रुग्णालयात नर्स होत्या. संशयित अरुण ढेपलेचे या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते आणि दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून अरुणने रंभाबाई यांचा खून केला. कोणालाही कुणकुण लागू नाही म्हणून हा मृतदेह अरुणने थेट विहिरीत फेकून दिला. यानंतर त्या अनेक दिवस दिसत नसल्याने त्यांचा भाचा प्रवीण घायाळने पोलीस स्टेशनमध्ये 24 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता मोबाईल सीडीआर आणि तांत्रिक उपकरणांच्या आधारे अरुणला ताब्यात घेतले.

nashik news
Yavatmal Crime: शेजाऱ्याच्या घरातील पोत्यात आढळला बेपत्ता ७ वर्षीय मुलीचा मृतदेह |Video

चौकशीच्या सुरुवातीला संशयित अरुण हा माझा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तो कबूल झाला आणि सांगितले की सदर महिलेचा खून करून आपणच मृतदेह विहिरीत टाकला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात रविवारी (दि.22) विहीरीतून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान अरुणने त्यानंतर विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com