नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी काढली अशोक खरातची वरात, पाहा VIDEO

Ashok Kharat Sexual Assault Case Latest Update: लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांची कठोर कारवाई; वरात काढत कायद्याचा धाक दाखवला.

लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला भोंदू अशोक खरातची नाशिक पोलिसांनी वरात काढत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' वदवून घेतले. अशोक खरातवर आज तिसरा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. SIT च्या माध्यमातून तपास झाल्यानंतर आज नाशिक पोलिसांनी खरातचा ताबा घेतला आणि त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याला पोलिसांनी खाकी देखील दाखवले असल्याचे सांगितले जात आहे. कायद्याचा बालेकिल्ला हा नाशिक पोलिसांचा पॅटर्न राज्यभरात चर्चेत आहे. यावेळी ताकद नाही राहिली म्हणत भोंदू खरात बाबा अक्षरशः रडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com