

बेपत्ता मुख्याध्यापकाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ
मुंबई-आग्रा महामार्गाजवळील घटना
वाके येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून होते कार्यरत
तासाभराच्या प्रयत्नानंतर विहिरीतून मृतदेह काढला बाहेर
अजय सोनावणे, नाशिक| साम टीव्ही
मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या ७० फूट खोल विहिरीत मृतदेह आढळल्यानं मालेगाव परिसरात एकच खळबळ उडाली. शशिकांत आहेर (वय ५७) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर विहिरीजवळ त्यांची दुचाकी आढळून आली होती. विहिरीत शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह आढळला. आहेर हे एका प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
शशिकांत आहेर हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. मुंबई - आग्रा महामार्गावरील एका हॉटेलजवळ असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. मुख्याध्यापक आहेर यांनी या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता प्राथमिक तपासानंतर व्यक्त केली जात आहे. या घटनेनं मालेगाव परिसरात खळबळ उडाली.
आहिरे हे वाके येथे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंब सोयगाव नववसाहत येथे वास्तव्याला आहे. आहिरे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागत नव्हता. त्यांचे कुटुंबीय त्यांचा सर्वत्र शोध घेत होते. शोध घेताना त्यांची दुचाकी महामार्गावरील एका विहिरीजवळ सापडली. त्यामुळे काहीतरी अनर्थ घडला असावा, असा अंदाज सगळ्यांना आला होता.
संबधितांनी तातडीने मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात संपर्क साधला. कुटुंबीयांच्या माहितीनंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी शकील तैराकी हे घटनास्थळी पोहोचले. विहीर खोल होती. या विहिरीत शोध सुरू केला. अग्निशमन कर्मचारी तैराकी यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आहिरे यांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.