

नाशिकमध्ये हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नाशिक म्हाडा १११ घरं विकण्यासाठी काढणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. नाशिकमधील प्राईम लोकेशनवर ही घरं असणार आहेत. त्यामुळे अनेकांना स्वस्तात ही घरं खरेदी करता येणार आहे. या घरांसाठी म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन नागरिकांना अर्ज करावे लागणार आहेत.
नाशिक म्हाडातर्फे, शहर परिसरातील पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, चेहडी शिवार आणि दसक शिवार येथे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सोडतीत रिक्त राहिलेल्या घरांची विक्री करणार आहे. ही १११ घरं असून यासाठी प्रथम प्राधान्य तत्वावर या घरांची विक्री केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे.
नाशिक म्हाडाच्या या घरांसाठी तुम्ही आजपासून अर्ज करू शकता. २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत तुम्हाला नोंदणी आणि अर्ज करता येणार आहे. तर २२ नोव्हेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकृती आणि योजना निश्तित करता येणार आहे. त्याचसोबत प्रशासकिय रकमेचा भरणा सदनिका निवडल्यानंतर ४८ तासांच्या आत करणे गरजेचे असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.