परळी ते शेगाव, मालेगाव ते म्हाडा अन् रामटेक ते बारामती; राज्यातील दुष्काळाची स्थिती काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Drought-Like Situation In 265 Talukas During Kharif 2026: राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप २०२६ मध्ये प्रथम कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पंचनाम्यांची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Maharashtra drought-like situation in 265 talukas during Kharif 2026
Maharashtra drought-like situation in 265 talukas during Kharif 2026saam tv
Published On: 

यावर्षीच्या जून महिन्यातील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगाम २०२६ मध्ये प्रथम कळ (ट्रिगर -1) लागू झालेल्या राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ७४ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती तर ठाणे, पालघर जिल्ह्यात पाऊस झाल्याने एकाही तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती नाही.

Maharashtra drought-like situation in 265 talukas during Kharif 2026
२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर विभागातील ७४ तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती

यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड व फुलंब्री; जालना जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन व जाफ्राबाद; बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर व वडवणी; लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी व जळकोट या तालुक्यांचा समावेश आहे.

Maharashtra drought-like situation in 265 talukas during Kharif 2026
दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकारची धावाधाव, राज्यात लवकरच दुष्काळ जाहीर होणार

याच महसूल विभागातील धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा व उमरगा; नांदेड जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर व नायगाव; परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत व पाथरी; तसेच हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव व वसमत या तालुक्यांनाही प्रथम कळ लागू झाली आहे.

Maharashtra drought-like situation in 265 talukas during Kharif 2026
दुष्काळ उठला बळीराजाच्या जीवावर, मराठवाड्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावती विभागातील ५६ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलडाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा व नांदुरा; अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरूड, मोर्शी, चांदूरबाजार व दर्यापूर; अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर व बार्शीटाकळी या तालुक्यांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा व मानोरा; तसेच यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी व राळेगाव या तालुक्यांनाही प्रथम कळ लागू करण्यात आली आहे.

नाशिक विभागातील ४९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला व देवळा; धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, सिंदखेडा व शिरपूर; जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर व यावल; नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्राणी; तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता या तालुक्यांचा समावेश आहे.

नागपूर विभागातील ३९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती

वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट व आष्टी; नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड व नागपूर शहर; भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी व लाखांदूर; गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा; चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही व पोंभुर्णा; तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व चामोर्शी या तालुक्यांचा समावेश आहे.

पुणे विभागातील ३५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर; सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा; सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत व कवठेमहाकाळ; सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा व महाबळेश्वर; तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड या तालुक्यांचा समावेश आहे. ठाणे विभागातील १२ तालुक्यांना दुष्काळसदृश्य परिस्थिती (प्रथम कळ) लागू झाली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन; रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर; तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड व वेंगुर्ला या तालुक्यांचा समावेश आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील एकाही तालुक्याला प्रथम कळ लागू झालेली नाही. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या २६५ तालुक्यांत पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com