सोलापूर हादरलं! विवाहितेनं दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं

Married Woman and Infant Son Found Dead in Well: सोलापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.
Married Woman and Infant Son Found Dead in Well
SOLAPUR SHOCKER: MARRIED WOMAN ENDS LIFE WITH TWO-YEAR-OLD SON BY JUMPING INTO WELLsaam tv
Published On
Summary
  • विवाहितेने मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

  • दोन वर्षांच्या चिमुकल्याचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

  • कौटुंबिक छळामुळे विवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप

कौटुंबिक छळाला वैतागून एका विवाहितेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मैंदर्गी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर मृत महिलेच्या आईने सासरच्या सात जणांविरोधात संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Married Woman and Infant Son Found Dead in Well
Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय ३०, रा. मैंदर्गी) या महिलेने मंगळवारी दुपारी तोरणी रोडलगत असलेल्या विहिरीत आपल्या दोन वर्षांच्या मुलगा शिवराजसह उडी घेतल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी माहेरी कळविली. घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीची आई कलव्वा बसप्पा पुजारी (रा. भोसगा पुजारी, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) या नातेवाइकांसह तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.

Married Woman and Infant Son Found Dead in Well
Shocking : "मुलगा होत नाही...." विवाहित महिलेची सासरच्या मंडळींकडून हत्या; पतीसह ५ कुटुंबीयांविरोधात गुन्हा

गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने विहिरीतून प्रथम दोन वर्षीय शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. याचदरम्यान भाग्यश्रीचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिलाही मृत घोषित केले.

मृत भाग्यश्रीच्या आईने दिलेल्या जबाबात, मुलीचा सासरच्या मंडळींकडून वारंवार छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये तिपव्वा कट्टीमणी, शरणप्पा कटीमणी, सिद्धप्पा कट्टीमणी, समर्थ कट्टीमणी, नागनाथ कट्टीमणी, गगव्वा पुजारी आणि यालप्पा कट्टीमणी यांचा समावेश असून, त्यांच्यावर सासू, सासरे, पती, दोन दीर, नणंद आणि अन्य नातेवाईक म्हणून आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार अमोल माने करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com