Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे-सोलापूरमध्ये पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update :
Maharashtra Live News Update :Saam Marathi
Published On

Kalyan : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड स्टंटबाजांचा अड्डा ठरतोय

पालकांनो या स्टंटबाजांमुळे लोकांचा जीव जातोय

कल्याणमधील जागरुक नागरीकांचे पोलिस आणि पालकांना आवाहन

madha : लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन

माढातील अंजनगाव खेलोबा येथील पुतळा प्रकरणी लक्ष्मण हाके यांना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी केली आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे आंदोलन ही करण्यात आले. अंजनगाव खेलोबा येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे.त्यानंतर आता हाकेच्या विरोधात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे‌.

Dharashiv : धाराशिवच्या येरमाळा कळंब महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

धाराशिवच्या येरमाळा येथे अद्याप ही वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोलापूर धुळे महामार्गासह येरमाळा कळंब महामार्गावर ट्रॉपीक जाम

येडेश्वरी देवीच्या याञेतील मुख्य पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातुन १५ लाखांहुन अधिक भाविक आले होते येरमाळ्यात

पहाटे ५ वाजल्यापासूनच

ट्रॉपीक जाम,अद्याप ही ट्रापीक जामच असल्यामुळे वाहनधारक ञस्त

राञी उशिरापर्यंत ट्रॉपीक सुरळीत होण्याची शक्यता,रस्ते जाम झाल्यामुळे जागोजागी वाहणांच्या लांबच लांब रांगा

pune : शिक्रापूरजवळ कंटेनरला आग; महामार्गावर वाहतूककोंडी

पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापूरजवळ पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेमुळे महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली असून अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरणी आरोपी सापडेना

संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरणी आरोपी सापडेला नाही. 20 दिवस या घटनेला उलटून गेले आहेत.

अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

अकोल्यातून खळबळजनक बातमी समोर. उच्चभ्रू वस्तीत सुरु होता देहविक्रीचा व्यवसाय. देहविक्रीचा हा प्रकार लक्षात येताच खदान पोलिसांनी उघडा पाडला देहविक्रीचा व्यवसाय.

कारंजा शहरासह तालुक्यात वादळी वारा आणि पावसासह गारपीट

वाशिम कारंजा तालुक्यात आज तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झालीये.

अकोल्यात पेट्रोल-डिझेल माफियांवर कारवाईसाठी पोलिसांचे विशेष पथक

घरघुती गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार रोखण्यासाठी अकोला पोलिसांनी नेमली पथके.

पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

पुण्याच्या राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा अचानक हल्ला

६५ हून अधिक ग्रामस्थ जखमी

Yavtmal : बावीस लाखाची तुरीचा ट्रक पळविणारे चार जण अटकेत

यवतमाळमध्ये 22 लाख रुपये किमतीची 250 क्विंटल तूर चोरट्यांनी सिनेस्टाइल पळवला

यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी परिसरात उघडकीस

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक

त्यांच्याकडून 234 क्विंटल तूर जप्त करण्यात आली आहे.

Pune : पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 105 गावांमध्ये गारपीट

पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 105 गावांमध्ये गारपीट

पुणे जिल्हा माहिती प्रशासनाकडून अहवाल सादर

अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 1785 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या पिकांचे नुकसान

पुणे शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वाधिक 1326 हेक्टर जागेतील शेतीचे नुकसान

शिरूर पाठोपाठ इंदापूर दौंड बारामती तालुक्यात सुद्धा पिकांचे मोठे नुकसान

गहू, कांदा, केळी, आंबा, मका, ज्वारी या पिकांचं फळांचे सुद्धा मोठे नुकसान

Jalgaon : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

जळगावात शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील एटीएम मशीन चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर

चोरट्यांचा एटीएम मशीन सोडतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे

चोरून नेलेले एटीएम मशीन जळगाव तालुक्यातील कंडारी गावाजवळील जंगलात सापडले

एमटीएम मशीन सापडले मात्र मशीन मधील दहा लाखांची रोकड चोरट्यांनी लाबविल्याची माहिती

Wardha : वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद

- वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्प मध्ये नव्या रहाटी सफारी गेटला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद

- रहाटी सफारी गेटवरून जंगल सफारीला जाणाऱ्या वाहनांची सेंचुरी पूर्ण

- वाघ, अस्वल, बिबट्यासह विविध वन्य प्राण्यांचे होत आहे नियमित दर्शन

Pune : अवकाळी पावसाचा पहिला बळी पुण्यात

अवकाळी पावसातच स्मार्ट सिटीचे तीनतेरा

अवकाळी पावसाचा पहिला बळी पुण्यात

एका महिलेचा झाड पडून मृत्यू झाला

बुलढाणातील चिखलीत रेणुका देवीची वहन मिरवणूक सुरू; हजारो भाविकांची गर्दी

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे रेणुका देवीची यात्रा उत्साहात सुरू असून वहन मिरवणुकीला रात्रीपासून सुरुवात झाली आहे. आरतीनंतर निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले आहेत. संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालणारी ही मिरवणूक सुमारे २० तासांहून अधिक काळ चालणार असून दुपारपर्यंत मंदिरात परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, दर्शनासाठी आणि देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा फटका; १७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाभुळगाव, दारव्हा, केळापूर, महागाव, राळेगाव, पुसद आणि यवतमाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ज्वारी व गहू पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे ज्वारी काळी पडण्याचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सुमारे १७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

मंचरमध्ये आईचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न; मुलाचा मृत्यू, आईवर गुन्हा दाखल

  • मंचर येथे प्रॉपर्टी वादातून आईने मुलांसोबत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • या घटनेत सहा वर्षांच्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर आई बचावली आहे.

  • पतीच्या तक्रारीवरून संबंधित आईवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रॉपर्टीच्या कारणावरून मुलांच्या जीवाशी खेळ केल्याचा संताप व्यक्त होत आहे.

नागोठणे येथे बस अपघात; २ ठार, २२ जखमी

  • रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात आज पहाटे भीषण बस अपघात झाला असून या दुर्घटनेत २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत.

  • पनवेलहून गोव्याकडे निघालेली एम.पी. 13-झेड पी 4545 ही खाजगी प्रवासी बस आज दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे ३:१५ वाजताच्या सुमारास सुकेळी खिंड, नागोठणे (रोहा, रायगड) येथे अपघातग्रस्त झाली.

  • खिंड चढत असताना चालक हेमंत कुमार बाजीराव पाटील यांचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली.

कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर अंघोळ करायला गेलेला व्यक्ती बुडाला

  • कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर अंघोळ करायला गेलेला इसम बुडाला

  • आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी शोध मोहीम राबवत मृतदेह शोधला

  • राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवड इथला 38 वर्षीय अरुण धोंडीराम गुरव अस बुडालेल्या व्यक्तीचे नाव

  • उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांकडे सुपूर्द केला

पुण्यात होणारा यो यो हनी सिंग चा कार्यक्रम पुढे ढकलला

  • पुण्यात होणारा यो यो हनी सिंग चा कार्यक्रम पुढे ढकलला

  • उद्या होणारा म्युझिकल कॉन्सर्ट आता 18 एप्रिल रोजी होणार

  • पुण्यात पावसाचा अंदाज असल्यामुळे हनी सिंगचा म्युझिकल कॉन्सर्ट पुढे ढकलला

  • राज्य सरकार ने दिलेल्या पावसाच्या शक्यतेनंतर आयोजकांचा निर्णय

साम टीव्हीने स्टिंग ऑपरेशनद्वारे धुळ्यातील जिल्ह्यात सुरू असलेल्या युरिया खताच्या काळाबाजारचा केला भांडाफोड

  • गेल्या कित्येक दिवसांपासून युरिया खताचा काळाबाजार सर्रासपणे सुरू होता आणि शेतकऱ्यांना विनाकारण जास्तीचे पैसे मोजून देखील मुजोर कृषी केंद्र चालकांची मनमानी सहन करावा लागत होती

  • परंतु साम टीव्ही ने यासंदर्भातील वाचता फोडल्यामुळे मुजोर कृषी केंद्र चालकांना चाप बसून दिलासा मिळाला असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत साम टीव्ही चे आभार मानले आहेत

पुण्यात एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पाईप नॅचरल गॅस (PNG) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली

ही वाढती गरज ओळखून नागरिकांना तात्काळ नवीन कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले

नागपुरात गोव्याचे पंप सतत 8 व्या दिवशीही बंद

नागपुरात गोव्याचे पंप सतत 8 व्या दिवशीही बंद असल्याच पाहायला मिळालं आहे....

तर गोव्याचे शहरातील काही पंप हे 10 दिवसापासून बंद आहे... त्यामुळे एलपीजीवर चालणाऱ्या ऑटो चालकांची चांगलीच आर्थिक अडचण होत आहे.

यासोबतच नागपुरात मिळणारे अनेक LPG पपं सुद्धा बंद आहे, पुरवठा खंडित झाल्यानं मोठा फटका बसला आहे...

पर्यायी पेट्रोलवर वाहन चालवताना याचं चालवणं हे परवडत नसल्यामुळे मोठी अडचण होत आहे.

९१ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी गुन्ह्याचा लावला छडा,घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण सूचकनाका परिसरात बंद हॉटेलचे शटर वाकवून रोकड व मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी उल्हासनगरातून अटक केली आहे.

अनिल संजु रूपवते वय २० वर्ष असे अटक आरोपीचे नाव असून त्याने कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात तब्बल ७ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे विद्यार्थी आणि नागरीक भितीच्या सावटाखाली

  • कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. कल्याण पश्चिमेतील बारदान गल्ली परिसर आहे. या परिसरात महापालिकेची शाळा आहे.

  • रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमुळे नागरीकांना फिरणे मुश्किल झाले आहे. आत्ता तर शाळेतील विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत आहे. भटक्या कुत्रे विद्यार्थी आणि नागरीकांच्या अंगावर धाऊन येतात. चावा घेण्याचा प्रयत्न करतात.

  • स्थानिक नागरीकांनी केडीएमसी आयुक्त आणि महापाैरांकडे या प्रकरणी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

नाशिक जिल्ह्यात काल सर्वत्र अवकाळी पावसाने तर काही भागात गारपीट झाली होती.निफाड तालुक्यात वादळी वारा व अवकाळी पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली होती.निफाड तालूक्यातील वाकद येथिल दिव्यांग शेतकरी अरुण बडवर यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा झालेल्या पावसाने भिजल्याने त्यांना मोठे नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.शारीरीक अडचणींवर मात करुन त्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले होते आणि ऐन काढून ठेवलेल्या कांद्याला त्याचा फटका बसल्याने शेतकरी निराश झाला असून शासनाकडे मदतीची मागणी त्यांनी केली आहे.

बदलापूर नगरपरिषदेची 85 टक्के मालमत्ता करवसुली

बदलापूर नगरपरिषदेनं सरत्या आर्थिक वर्षात तब्बल 85 टक्के मालमत्ता कराची वसुली केलीय. नगर परिषदेच्या 2025-26 या आर्थिक वर्षात 89.92 कोटी इतकी मालमत्ता कराची मागणी होती. त्यापैकी 31 मार्च पर्यंत सुमारे 76.45 कोटी रुपये कराची वसूली करण्यात पालिकेला यश आलंय. विशेष म्हणजे यापैकी 19 कोटी रुपये हे ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात आले आहेत. यंदा जास्तीत जास्त मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अभय योजना देखील जाहीर करण्यात आली होती. कर वसुलीसाठी पालिकेनं आठ पथकही नेमली होती.

अंजनगावातील खेलोबा मंदिरात पोलिसांची सुरक्षा वाढवली

अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरून सुरू असलेला वाद आता टोकाला गेला आहे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत त्यामुळे येथील प्रसिद्ध खेलोबा मंदिरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

मंदिराच्या चारी बाजूंनी पोलिसांनी बॅरिकेटिंग करून मंदिर सुरक्षित केले आहे शिवाय मंदिरामध्ये जवळपास शंभर ते दीडशे पोलीस यांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

येथील खेलोबा मंदिर राजा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे त्यामुळे येथील धनगर समाज आणि मराठा समाजामध्ये वाद सुरू झाला आहे त्यानंतर आता पोलिसांनी खबरदारी म्हणून येथील खेलोबा मंदिराची सुरक्षा वाढवली आहे.

पुण्यात महापौरांची आपत्ती व्यवस्थापन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यासोबत बैठक सुरू

महापौर मंजुषा नागपुरे घेत आहेत बैठक

काल पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते

यावर आढावा घेणार असून या पुढे अश्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला काही सूचना दिल्या जाणार आहेत

आपत्ती व्यवस्थापन विभागाचा ही आढावा घेत आहेत

जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये राडा... संतप्त नागरिकांचा गॅस सिलिंडरसाठी रास्ता रोको !

जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेत अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि नव्या नियमांमुळे मोठा गोंधळ उडाला. सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर जोरदार निदर्शने करत भुसावळ-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले.

राऊतांचा जळगावातून उद्धव ठाकरेंना घरचा आहेर

• तीन वर्ष आधीच उमेदवार ठरवण्याचा राऊतांचा सल्ला • मातोश्रीबाहेर न पडण्यावर राऊतांचा अप्रत्यक्ष टोला • उबाठा गटातील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर
नवनाथ बन

भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर अंनिस आक्रमक

- नाशिकमध्ये अंनिसच्या राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेला सुरुवात

- संघर्ष परिषदेला राज्यभरातून ३०० हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती

- राज्यात भोंदू बुवांच्या प्रकरणांमुळे बुवाबाजीचे भीषण वास्तव समोर

- बुवाबाजीच्या माध्यमातून आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाचे रॅकेट उघड झाल्यानं अंनिसच्या संघर्ष परिषदेत महत्वाचे ठराव

- अंनिसकडून गेल्या ३६ वर्षांत हजारो भोंदूंचा पर्दाफाश

- जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाईला वेग येण्यासाठी परिषदेत अंधश्रद्धाविरोधी संकल्प

- राज्यासह केंद्र सरकारकडे अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कडक कायदे करण्याची मागणी करणार

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

सलग तीन दिवसांच्या सुट्टयांमुळे पर्यटक कोकणाच्या दिशेने निघाल्याने झाली आहे वाहतूक कोंडी

० माणगाव पुणे मार्गावर देखील कोकणाच्या दिशेने येणाऱ्या लाईनवर वाहनांच्या रांगा

Junnar: जुन्नरमध्ये मुसळधार पाऊस व गारपिटीचा तडाखा; विटभट्टी व्यवसायाला मोठा फटका

जुन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसासह गारपिटीमुळे शेतीपूरक व्यवसायांवर मोठं संकट ओढवलं आहे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या विटांचा मोठा साठा पावसामुळे खराब झाला असून, विटभट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.

Nandurbar: नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यामुळे झाड उलमडून पडली....

नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यामुळे झाड उलमडून पडली....

अचानक आलेल्या वादळी वारामुळे कार वर कोसळल भलं मोठं झाड....

कारवर झाड आदळल्याने कार चकणाचुर.....

नंदुरबार शहरातील शहाबाई नगर परिसरातील घटना....

झाड कोसळण्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद....

Pune: पुणे का तुंबतय? कोथरूडकर उतरले थेट ओढ्यात

पुणे का तुंबतय? कोथरूडकर उतरले थेट ओढ्यात

ओढ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून केल जात आहे बांधकाम

कोथरूड मधला नाला बुजवून केला जात डीपी रस्ता

यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याचा आरोप

कोथरूडकरांचा जीव घेतल्यावर ओढे-नाले वाचवणार का?

कालच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर साचलं होतं पाणी

या परिस्थितीला जबाबदार कोण?

Pune:पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील ठाकरे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती

जितेंद्र बडेकर,हवेली(समाज कल्याण )

अमोल नलावडे,वेल्हे(बांधकाम व आरोग्य)

दीपाली हुलावळे मावळ,(कृषी सभापती)

पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नव्या सभापतींचा कार्यकाळ हा फक्त सव्वा वर्षाचा असणार आहे.

सभापती पद देतानाच नवीन सभापतींना त्यांच्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळाची पूर्वसूचना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीय.

काल निवड झालेल्या नवीन सभापतींचा कार्यकाळ २ जुलै २०२७ पर्यंतच असणार आहे..

Nandurbar: नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नंदुरबार तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...

जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी...

ऐन काढणीच्या टप्प्यातील पिके उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला..

पूर्व भागानंतर आता पश्चिम भागातही वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटका..

चार दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..

टोकरतलाव शिवारातील राठोड यांच्या दोन एकरांवरील मका पीक पूर्णपणे आडवे...

नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावात वीज पडून एका बैलाचा मृत्यू...

अवकाळी पावसामुळे नांदरखेडा, आष्टी आणि टोकर तलाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Pune: पुण्यात रिंग रोडच्या कामादरम्यान ऑपरेटरचा मृत्यू

पुण्याच्या हवेली तालुक्यातील वरदाडे येथे, रिंग रोडच्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका तरुण ऑपरेटरचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

विजय कुमार असं मृत व्यक्तीचं नाव..

सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती

कामादरम्यान क्रेनवर चढताना संबंधित तरुणाने कोणत्याही प्रकारचे सेफ्टी साधन, विशेषतः लाइफ जॅकेट किंवा इतर सुरक्षात्मक उपकरण वापरले नव्हते.

याचदरम्यान शिडीवरून त्याचा पाय घसरला आणि तो थेट सुमारे ४० फूट खोल नदीपात्रातील पाण्यात कोसळला..

Malad: मालाडच्या मालवणीमध्ये गॅस सिलिंडरसाठी मोठ्या रांगा

मालवणीमध्ये गॅस सिलिंडरसाठी मोठ्या रांगा

मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात एचपी गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी

अनेक नागरिक काल रात्री १० वाजल्यापासून रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे

नंबर लागू राहावा म्हणून काहींनी सिलिंडरला कुलूप लावून रांगेत ठेवले

सकाळपर्यंत रस्त्यावर शेकडो सिलिंडरची रांग दिसून आली

इराण-इजराइल-अमेरिका युद्ध तणावाच्या पार्श्वभूमीवर पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती

नागरिकांमध्ये गॅस टंचाईची भीती, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी

Ratnagiri: साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

रत्नागिरी- साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील घटना

पुण्याहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती खासगी बस

बस मधील ३० प्रवाशी सुखरूप बाहेर पडले, बसने अचानक पेट घेतल्याने प्रवासी घाबरले

अग्निशमन दलाच्या गाडीला आग विझवण्यात यश

चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गॅस पुरवठा खंडित असल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र या बाजारपेठेमध्ये भाजीपाला पडूनच आहे कारण नवी मुंबईमध्ये , मुंबईमध्ये हॉटेलमध्ये गॅस पुरवठा मिळत नसल्यामुळे त्यामुळे हॉटेल व्यवसायिक इथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडूनच आहे याचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे

Parbhani: परभणी शहरात मागील 2 दिवसापासून LPG गॅस पंप बंद, ऑटो चालक अडचणीत

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता परभणी जिल्ह्यातील ऑटो चालकाना बसला आहे . परभणी शहरात मागील दोन दिवसांपासून शहरातील 7 एलपीजी गॅस पंप बंद असल्याने ऑटो चालकांवर मोठे संकट ओढवले आहे. शहरातील सुमारे 2 ते 3 हजार ऑटो LPG गॅस वर चालणारे आहेत त्यामुळे दैनंदिन उत्पन्न ठप्प झाले असून, अनेकांवर ऑटो चालकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे ऑटो रस्त्यावर उतरू शकत नाहीत, परिणामी पेट्रोल वर ऑटो चालवायला परवडत नसल्याने ऑटो चालकाने प्रवासी भाव वाढवले असले तरी ग्राहक तेवढे पैसे देण्यास नकार देत आहेत त्यामुळे ऑटो चालक चांगलाच अडचणी आला आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ऑटो चालकांकडून केली जात आहे.

Jalgaon: जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात शॉक सर्किटमुळे आग

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात शॉक सर्किट मुळे अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीमध्ये दोन ते तीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली असून अचानक शॉक सर्किट मुळे ही आग लागली जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या आधारे ही आग आटोक्यात आणण्यात आली या आगमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

पीएमपी बसमधील चोरी व महिला विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)च्या बसमध्ये चोरी तसेच महिला विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सुरवसे-पाटील यांनी पीएमपी प्रशासनाकडे निवेदन दिले असून, महिला प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी सर्व बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये अद्याप सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बसमधील चोरी किंवा विनयभंगाच्या घटनांतील आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी कठीण ठरत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी महिलांशी गैरवर्तनाच्या घटना घडत असून, पुराव्याअभावी अनेक प्रकरणे अनुत्तरित राहतात.

पिंपरी-चिंचवडला वादळी पावसाचा तडाखा, १७ ठिकाणी झाडपडी, वाहनांचे मोठे नुकसान.

पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने दाणादाण उडवून दिली. अवघ्या पाच तासांत शहरात १७ ठिकाणी झाडे कोसळली असून, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लातूर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा ; 1 हजार 345 हेक्टर वरील शेती पिकांना फटका

लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील एकूण 1हजार 345 हेक्टर वरील पिकांना गारपिट आणि अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय., आंबा फळबागेसह द्राक्ष शेतीला देखील गारपिटीने झोडपले आहेत., तात्काळ पंचनामा करून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा झाला लाल चिखल...

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकासोबतच फळबाग व भाजीपाला वर्गीय पिक घेण्याकडे वळताना दिसतोय.. मात्र पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.. बुलढाण्याच्या नांद्राकोळी येथील शेतकरी शिवाजी तायडे यांनी आपल्या दोन एकर शेतीपैकी अर्धा एकर क्षेत्रफळामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली, त्यासाठी त्यांना आतापर्यंत जवळपास 50 हजार रुपये खर्च आला, आता टोमॅटो पीक काढणीला आलंय, मात्र योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो बाजारात नेण्याचा खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाहिये .. त्यामुळे हताश होऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे टोमॅटो आता जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे.. परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा लाल चिखल झाल्याचं पाहायला मिळतय...

उन्हाचा झळा अन् अवकाळीचा घाव; शेळ्या-मेंढ्यांवर दुहेरी संकट

उन्हामुळे चक्कर येऊन आधीच मोठ्या प्रमाणात मेंढ्यांचा मृत्यू झाला होता, तर आता अचानक थंडी, गारपीट आणि रोगराईमुळे शेळ्या-मेंढ्यांचा जीव जात आहे. लेकरांसारखं जपलेलं पशुधन डोळ्यांसमोर दगावत असल्याने मेंढपाळ हतबल झालेत उन्हात होरपळ… आणि आता पावसात गारठा.माळरानावर भटकणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांवर दुहेरी संकट कोसळलंय उन्हाच्या तडाख्यात चक्कर येऊन मृत्यू, तर आता गारपीट आणि थंडीने पशुधन दगावत आहे.लेकरांसारखं जपलेलं जनावरं गमावत असल्याने मेंढपाळांच्या डोळ्यात अश्रू आहेत.सरकारकडून तातडीने मदत आणि पशुवैद्यकीय उपाययोजना करण्याची मागणी जोर धरतेय.

पिता पुत्राला मारहाण केल्याच्या प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या निर्दोष

ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याच्या आरोपातून सतीश भोसले उर्फ खोक्या याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले... तर एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे.. परंतु त्यासह इतर प्रकरणात त्याला जामीन मिळालेला असल्याने सतीश भोसले उर्फ खोक्या आता तब्बल वर्षभरानंतर जेल बाहेर आला आहे... आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा सतीश भोसले हा बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात चर्चेत आला होता... त्यानंतर त्याच्यावर ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याचा देखील गुन्हा दाखल झाला होता... त्याने सोशल मीडियावर केलेल्या देखील चर्चेत आल्या होत्या... दरम्यान त्याची आता ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणात दाखल गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याची संभाजीनगर येथील कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. दि. २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.

पावसाने पुण्यात महिलेचा घेतला जीव

पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसात सिंहगड रस्त्यावर हृदयद्रावक घटना घडली असून, मंदिराशेजारी फुल विक्री करीत बसलेल्या महिलेच्या अंगावर भलेमोठे झाड कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या १५ ते २० वर्षांपासून रंजना गिरी या मंदिराशेजारी फूल विक्री करीत होत्या. उन्हात-पावसात आसरा देणारे हेच वडाचे झाड आज त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

नागपूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- कुमार आशीर्वाद हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी 22 जुलै 2023 रोजी सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.

- सोलापूर येथे जवळपास तीन वर्षांची सेवा दिल्यानंतर आता त्यांची मुख्यमंत्र्यांच्या होमग्राउंड असलेल्या नागपुरात नियुक्ती करण्यात आली आहे.

- नागपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर कुमार आशीर्वाद हे पदभार स्वीकारणार आहेत.

लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची बदली, डॉ भारत बास्टेवाड हे लातूरचे नवीन जिल्हाधिकारी

लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची बदली मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर लातूर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर भारत बास्टेवाड हे रजू होणार आहेत, ते यापूर्वी नागपूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी येथे आयुक्त म्हणून कार्यरत होते.

अवकाळीचा घाव; काढणीचा कांदा पाण्यात, शेतकरी उद्ध्वस्त

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात सलग चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलं आहे.

काढणीला आलेला कांदा शेतातच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचं वर्षभराचं अर्थकारण कोलमडलंय मोठा खर्च, काबाडकष्ट आणि आशा हि सारी स्वप्न उराशी असताना पण अवकाळी पावसाने सगळं पाण्यात गेलं.शेतात उभा असलेला कांदा अक्षरशः सडू लागलाय.विक्रीच्या उंबरठ्यावरचं पीक नष्ट झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला असून तातडीच्या मदतीची मागणी जोर धरतेय.

मेट्रोला प्रवाशांचा वाढता पाठिंबा! मार्च महिन्यात 8.96 कोटींची कमाई

मागील काही वर्षात पुणे मेट्रोचा मोठा विस्तार झाला आहे. पुण्यात रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यावर उपाय म्हणून मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढतेय.

-यंदाच्या मार्च महिन्यात पुणे मेट्रोने तब्बल ८.९६ कोटींची कमाई नोंदवली आहे.

-या महिन्यात मेट्रोने ५७.६९ लाखांहून अधिक प्रवाशांची सुरक्षित आणि जलद वाहतूक केली.

अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुण्यात काल दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले. अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत

-सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते.

-दुपारी अडीच ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाडपडीच्या ८२ घटना घडल्याची नोंद अग्निशामक विभागाकडे होती.

-यासह पाणी साचल्याच्या ६ घटना, तर सीमा भिंत पडल्याची १ घटना घडल्याचा कॉल अग्निशमन विभागाला प्राप्त झाला होता. झाड व भिंत पडून काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

आखाती देशातील युध्दाचा परिणाम, येरमाळा येथील याञेत हॉटेल व्यवसायिकांवर चुली पेटवण्याची वेळ

आखाती देशात सुरू असलेल्या युध्दाचा परिणाम आता धाराशिव मधील प्रसिध्द असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञेत देखील पाहायला मिळत आहे.पाच दिवस चालणाऱ्या या याञेसाठी राज्यभरातुन लाखो भाविक येत असतात त्यामुळे हॉटेल व्यावसायिक या याञेत आपला व्यवसाय थाटत असतात मात्र यंदा युध्द परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस वितरण बंद असल्याने व्यवसायिकांना चुली पेटवण्याची वेळ आली आहे.चुलीवर स्वयंपाक करताना धुराचा मोठा ञास सहन करावा लागत असुन त्यातच अचनाक अवकाळी पाऊस पडला की मोठी अडचण निर्माण होतेय,लाकडाचे भाव देखील वाढले आहेत त्यामुळे व्यवसायिकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे.डोळ्यांना ञास होतोय तर धुरामुळे ग्राहक देखील येत नसल्याने मोठा फटका बसत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस एजन्सी मोठा काळा बाजार उघड

राज्यस्तरीय दक्षता पथकाची गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार येथे आज पहाटे धाड

LPG टॅंकरचे सिल तोडून गॅसची चोरी करताना दोन व्यक्ती आढळून आले.

LPG गॅसने भरलेले एच. पी. कंपनीचे टॅंकर क्रमांक MH43 K 5921 मध्ये १७५९० किलो व MH 43CK 5747 मध्ये १७६३० किलो भरलेले कॅप्सूल टॅंकर आढळून आले.

तसेच १९.२ किलो चे १७ भरलेले सिलेंडर व ६ रिकामे सिलेंडर आढळले.

१४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर व ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर आढळून आले.

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह पुणे शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. सलग चौथ्या दिवशीही पावसाने दमदार पुनरागमन करत शहरातील जनजीवन विस्कळीत केले. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून रस्ते जलमय झाले, तर वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी गाड्यांचे नुकसान झाले असून झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, बळीराजा संकटात

मागील चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे, सोलापूर, हिंगोलीसह कोकण आणि मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतामधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडलाय. आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com