Manoj Jarange on chhagan bhujbal: छगन भुजबळ यांची खायची हाव संपेना; मनोज जरांगेंची टोकाची टीका

Manoj Jarange patil on chhagan bhujbal political news: छगन भुजबळांची खायची हाव संपेना. आज चुकून छगन भुजबळ यांचं नाव घेतलं, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टोकाची टीका केली.
Manoj Jarange in Ahmednagar
Manoj Jarange in AhmednagarSaam tv
Published On

सचिन बनसोडे

Manoj Jarange latest Speech:

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मंत्री छगन भुजबळांवर टीका सुरुच आहे. मनोज जरांगे यांनी आजही नगरच्या नेवासा येथील सभेतून छगन भुजबळांना लक्ष्य केलं. 'अनेक वर्ष आमचं आरक्षण खाल्लं. छगन भुजबळांची खायची हाव संपेना. आज चुकून छगन भुजबळ यांचं नाव घेतलं, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टोकाची टीका केली. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. जरांगे आज गुरुवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात जरांगे यानी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांवर टीका केली. नेवासा येथील सभेत जरांगे यांनी सरकारला कडक शब्दात इशारा दिला.

Manoj Jarange in Ahmednagar
Hingoli News : ४८ तासांपासून युवक पाण्याच्या टाकीवरच; ग्रामस्थ व पोलीसही विनंती करून थकले, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन

मनोज जरांगे सभेत काय म्हणाले?

मनोज जरांगे म्हणाले, 'मराठ्यांच्या लाटेत कुणालाच काही सुचेना. आरक्षण असलेले आणि नसलेले सगळे मराठे एकत्र झाले आहे. चारही बाजूंनी मराठ्यांनी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण कुणाचे नाव घेत नाही. ज्यांची पात्रता नाही. सरकारने मराठा समाजाला गांभीर्याने घ्यावं. आमचे बॅनर फाडले. त्यामुळे अजित पवारांनी त्यांना समज द्यावी. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्ही संयम धरलाय...: जरांगे

'कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बॅनर फाडले तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आम्हाला उचकवू नका. सरकारने त्यांना शांत केलं नाही, तर सरकार डॅमेज होईल. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा मराठा बांधव तुमच्या देखील चाव्या काढून घेतील. एकदा पदरात आरक्षण मिळू द्या, मग त्यांच्याकडे बघू. ते अंबडमध्ये येऊन खूप काही बोलून गेले. आरक्षण जवळ आलं आहे, त्यामुळे संयम धरला आहे, असे जरांगे म्हणाले.

जरांगे यांचं भुजबळांवर टीकास्त्र

जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवरही जोरदार टीका केली. 'मला म्हणत आहे की, माझं पाचवीपर्यंत शिक्षण झालंय. तुम्ही तुरुंगात जाऊन आले, त्यामुळे तुमचा अभ्यास काय कामाचा?अनेक वर्षे आमचं आरक्षण खाल्लं. त्यांची खाण्याची हाव अद्याप संपलेली नाही. ते राज्याची शांतता बिघडण्याचं काम करत आहे, असं म्हणत जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर टीका केली.

Manoj Jarange in Ahmednagar
Chandrashekhar Bawankule Casino: बावनकुळेंनी कॅसिनोत गेल्याचे मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे हाेते : मनसे आमदार राजू पाटील

जरांगे यांचा सरकारला इशारा

'ते जातीय तेढ निर्माण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी छगन भुजबळ यांना समज द्यावी. अन्यथा आम्ही सज्ज झालोय. भुजबळ यांना सरकारचे पाठबळ आहे का? असा सवाल जरांगे यांनी यावेळी सरकारला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com