मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात एसटी बसची जाळपोळ तसेच तोडफोडीच्या घटना घडत आहेत. हीच बाब लक्षात घेता महामंडळाने एसटीला ब्रेक लावला आहे. आज अनेक जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एसटी बसकडे सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन म्हणून पाहिलं जातं. दररोज हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. दिवाळीचा सण तोंडावर आल्याने प्रवाशांची लगबग वाढली आहे. मात्र, मराठा आंदोलनामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मराठवाड्यातील बीड, संभाजीनगर, सोलापूर, परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
बीड शहरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने जिल्ह्यातील एसटी सेवा संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेसच्या ७० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा,जामखेड, पारनेर या तालुक्यांमध्ये एसटी सेवा बंद राहणार आहे.
पंढरपूर तसेच हिंगोली जिल्ह्यातील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही बसेस पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.
विदर्भातील अकोला आणि वाशिम या जिल्ह्यातून मराठवाडा तसेच पुण्याकडे धावणाऱ्या बसेसच्या तब्बल ४७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हिंगोली शहरातील बससेवा बंद आहे. याशिवाय नंदुरबार, सांगली चिपळून आणि धुळे आगारातील बहुतांश बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.