ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सामान्यांना मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.
तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 101.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून ही वाढ करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काही दिवसांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder Price) किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅसचे दर वाढवले आहेत. व्यावसायिक गॅस 101.50 रुपयांनी महागला आहे.
दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 902.5 रुपये आहे. तर दिल्लीत घरगुती सिलिंडर 903 रुपये, पश्चिम बंगाल 929 रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅस सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे. (Latest Marathi News)
गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेलाही तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरला 1731.50 रुपयांनी विकला जात होता.
वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 1943 रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईत 1785.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी 1 ऑक्टोबरलाही व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 209 रुपयांनी वाढले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.