बालाजी सुर्वे, धाराशीव
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये खलबते सुरू झाली आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातही उमेदवार देण्याचा निर्णय मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाकडून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
धाराशीव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सकल मराठा समाज उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. या लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे जो उमेदवार देतील, त्याला गुलाल लावण्याचा निर्णय सकल समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. धाराशिवातील स्वयंवर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभेच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली.
धाराशिवातील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत इच्छुक उमेदवारांसह मराठा बांधव सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने जो उमेदवार निवडला जाईल, त्यासाठीच सर्वांनी काम करण्याची शपथ या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला धाराशीव लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते.
दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने जालन्यातही बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उमेदवारी दाखल करावी, अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली. या बैठकीतील ठराव एकमताने पारित करून मनोज जरांगे यांना पाठविण्यात आला आहे. मराठा समाजाच्या वतीने पारित केलेल्या प्रस्तावावर मनोज जरांगे यांच्याकडून कोणता निर्णय घेण्यात येईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. तसेच या बैठकीत मराठा समाजाने स्वतंत्र उमेदवार दिला तर त्याचा परिणाम काय होईल, यावर चर्चा करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.