काळे झेंडे अन् जोरदार घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलक आक्रमक

Eknath Shinde Parbhani Rally Maratha Protesters Black Flags: परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. पन्नासहून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Eknath Shinde Parbhani rally Maratha protesters black flags
Eknath Shinde Parbhani rally Maratha protesters black flagssaam tv
Published On

विशाल शिंदे, साम टीव्ही

परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभेच्या ठिकणाबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. पन्नासहून अधिक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Eknath Shinde Parbhani rally Maratha protesters black flags
मोठी बातमी! शिंदें-फडणवीसांवर मनोज जरांगे भडकले; 'त्या' वक्तव्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले

दरम्यान एकणाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात होताच जाही आंदोलक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. अचानक काळे झेंडे दाखवण्यात आल्याने सभेच्या ठिकाणी पोलिसांची धावपळ झाली.

Eknath Shinde Parbhani rally Maratha protesters black flags
Manoj Jarange: आरक्षणासाठी मनोज जरांगे ११ व्यांदा उपोषणाला बसले, आतापर्यंत किती वेळा आणि कुठे केला एल्गार?

या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना विनंती करत काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवर आणा, अशा सूचना दिल्या. त्यामुळे सभास्थळी काही काळ या घटनेची चर्चा रंगली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचं या घटनेतून दिसून आलं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून, सभेच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

Eknath Shinde Parbhani rally Maratha protesters black flags
मनोज जरांगे मुंबईत धडकणार? मुख्यमंत्री निवासस्थानी आंदोलन करणार?

एकीकडे आंतरवालीसराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांची सभा असल्याने मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र हा कार्यक्रम दोन महीनेआधीच निश्चित झाला असल्याने रद्द करणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावरूनच सभा स्थळी एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com