मनोज जरांगे मुंबईत धडकणार? मुख्यमंत्री निवासस्थानी आंदोलन करणार?

Manoj Jarange Mumbai protest on August 29 for Maratha reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी थेट मुंबईत धडक देण्याचा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानालाच जरांगेंनी लक्ष्य केलंय. त्यामुळे २९ ऑगस्टच्या उपोषणासाठी जरांगेंनी काय रणनीती आखलीय? जरांगेंनी दोन्ही राजेंना काय साद घातलीय? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....
Manoj Jarange warns Maharashtra government over Maratha reservation
Manoj Jarange warns Maharashtra government over Maratha reservationsaam tv
Published On

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच 'वर्षा' बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिलाय. मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीत आमरण उपोषणाची घोषणा केलीय. मात्र वेळ आली तर थेट मुंबईत धडक देण्याचे संकेतच जरांगेंनी दिलेत...यामुळे मात्र राज्य सरकारची डोकेदुखी वाढलीय. मराठा आरक्षण उपस्मितीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तर जरांगेंच्या मागण्यांवर विचार केला जाईल मात्र त्यांनी जरांगेंच्या मंत्र्यांबाबतच्या विधानांवर नापसंती व्यक्त केलीय.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणासंदर्भात मध्यरात्री बैठक झाल्याची चर्चा आहे...त्यामुळे जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेत यावेळी आंदोलन दडपण्याची कोणतीही चूक करू नका, अशा इशारा सरकाराला दिलाय... इतकचं नव्हे तर मराठ्यांना बाजूला केलं तर सत्तेला हादरा बसेल, असा दावाही जरांगेंनी केलाय...

दरम्यान जरांगे पाटील यांनी कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही राजघराण्यांना कुणबी नोंदीची शिदोरी शासनाकडे उघडी करण्याचं आवाहन केलंय..

ऑगस्ट 2025मध्ये मुंबईतील आंदोलनावेळी 5 दिवस मराठ्यांनी आझाद मैदानासह मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन केली होती...लाखो आंदोलक मुंबईत आल्यानं प्रशासकीय व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला होता...सरकारही या आंदेलनामुळे मेटाकुटीला आलं होतं. त्यामुळे भरव्यासपीठावरून जरांगेंनी मंत्र्यांकडून आपल्या मागण्याही वदवून घेतल्या होत्या..त्यामुळे आता 29 ऑगस्टचं मराठा आंदोलन नेमकं कुठे होणार? याबाबत संभ्रम आहे...मात्र अवैध कुणबी नोंदींचा मुद्दा सरकारनं वेळीच निकाली काढला नाही, तर जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com