मराठा आंदोलनासाठी निघाले अन् नियतीने घात केला! बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

Maratha Protester Dies In Kej: मराठा आरक्षण आंदोलनात जाणाऱ्या एका आंदोलकांचा मृत्यू झालाय. अंतरवाली सराटी येथे जाणाऱ्या मराठा आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
MARATHA PROTESTER DIES OF HEART ATTACK WHILE HEADING TO ANTARWALI SARATI AGITATION
MARATHA PROTESTER DIES OF HEART ATTACK WHILE HEADING TO ANTARWALI SARATI AGITATION
Published On
Summary
  • मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

  • या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे रवाना होत आहेत.

  • केज तालुक्यातील सुग्रीव बापू शिंदे हे सहकाऱ्यांसोबत आंदोलनासाठी निघाले होते.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे निघत आहेत. मात्र त्याचदरम्यान एक दुखजनक घटना घडलीय. केज तालुक्यातील आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय.

MARATHA PROTESTER DIES OF HEART ATTACK WHILE HEADING TO ANTARWALI SARATI AGITATION
Manoj Jarange: आरक्षणासाठी मनोज जरांगे ११ व्यांदा उपोषणाला बसले, आतापर्यंत किती वेळा आणि कुठे केला एल्गार?
MARATHA PROTESTER DIES OF HEART ATTACK WHILE HEADING TO ANTARWALI SARATI AGITATION
मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी महत्त्वाचा निर्णय

सुग्रीव बापू शिंदे असे या आंदोलकाचे नाव आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी सु्ग्रीव शिंदे हे जात होते. त्यावेळी त्यांनी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सराटी आंतरवाली येथे आजपासून उपोषण सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुग्रीव शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह सराटी अंतरवाली कडे जात होते. गेवराईजवळ त्यांचे वाहन आले असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आहे. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिलीय.

MARATHA PROTESTER DIES OF HEART ATTACK WHILE HEADING TO ANTARWALI SARATI AGITATION
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीय. जरांगे पाटील आंदोलनासाठी बसलेत. हे आंदोलन निर्णायक असेल असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिलाय. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मुंबईला धडक देणार असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. यावेळी मुंबईत 45 लाख मराठा कार्यकर्ते धडकतील, असं ते यावेळी म्हणालेत.

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे रास्तारोको करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर -जळगाव महामार्गावरील वाहनं अडवण्यात आली आहेत. आंदोलकांनी रस्त्यातच बेमुदत रास्तारोकोचं बॅनर लावल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सोलापुरातील माढामध्ये मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची गाडी अडवली. धावत्या गाडीमागे पळत जाऊन या आंदोलकाने बाबासाहेब पाटील यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला. बापू गायकवाड असं या मराठा आंदोलकाचं नाव आहे. त्याने सहकार मंत्र्यांच्या धावत्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर तो थेट गाडीखाली घुसला त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com