फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. दोषींना संरक्षण दिल्यास प्रश्न उपस्थित होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
Manoj Jarange
Manoj Jarange Patil Saam Tv
Published On: 

अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी

Manoj Jarange Patil viral audio clip controversy : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून महायुतीमधील भाजप-शिवसेना यांच्यात तडा गेला. जरांगे पाटील यांनी यावरून आज सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर अतिशय तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. "माझ्याविरोधात अतिशय विखारी प्लॅनिंग करून सत्य झाकण्यासाठी काहींचा आटापिटा सुरू आहे," असा थेट आरोप करत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

ऑडिओ क्लिपची मागची स्टोरी काय?

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "मला या षडयंत्राची ९ ते १० महिन्यांपूर्वीच माहिती मिळाली होती. मला ती रेकॉर्डिंग ऐकवण्यातही आली होती, पण अधिकृत नाव घेण्यासाठी माझ्याकडे भक्कम पुरावा नव्हता. २९ ऑगस्टनंतर पाच-सहा दिवसांनी ही क्लिप माझ्या हातात आली. त्यानंतर उपोषण, दवाखाना आणि दसरा मेळाव्याची तयारी यात वेळ गेला. मला बदनाम करून मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न का केला जात आहे, हा प्रश्न विचारायचा होता, म्हणून मी दसऱ्याच्या दिवशी हा विषय मांडला."

Manoj Jarange
NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

राऊत आणि लाड यांचा संबंध नाही!

या प्रकरणात संजय राऊत किंवा प्रसाद लाड यांचा नावे जोडली जात असल्याबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, "या विषयात संजय राऊत किंवा भाजप नेते प्रसाद लाड यांचा काहीही संबंध नाही. उगाच भलतीच नावे जोडून पळवाट शोधू नका. दोन दिवस ही क्लिप 'एआय' (AI) निर्मित आहे असे सांगण्यात आले. पण हे लोक सत्तेच्या जोरावर खोटंही खरं करून दाखवू शकतात. सत्ताधाऱ्यांना असा संदेश द्यायचा आहे का, की त्यांच्याविरोधात कोणीच बोलायचे नाही?"

Manoj Jarange
दिवाळीआधी पगार मिळणार की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

"फडणवीस-शिंदेंनी दोषींना सोडू नये"

जरांगे पाटील म्हणाले, "शिंदे साहेबांनी यात सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर त्यांच्या परस्पर किंवा फडणवीस साहेबांच्या नकळत काही ५-६ लोकांनी हे कटकारस्थान केले असेल, तर फडणवीस साहेब त्यांना नक्कीच सोडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. पण जर दोषी असणाऱ्या आपल्या लोकांना फडणवीसांनी सोडले, तर यामागे त्यांचाच हात होता हे जगजाहीर होईल. त्यामुळे सत्य काय आहे ते समोर आलेच पाहिजे."

पैसे ऑफर केल्याच्या मुद्द्यावर बोलताना ते उपरोधाने म्हणाले, "मला जेव्हा या पैशांबद्दल कळले तेव्हा काही सुचतच नव्हते. एवढे पैसे मोजायचे म्हटले तर मला आणि माझ्या पत्नीला ७-८ वर्षे लागली असती. पैसे मोजता मोजताच आम्ही वेडे झालो असतो, मग त्याचा आनंद कधी घेणार?"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com