Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

Manoj Jarange Announce Big Decision Today: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. त्यांच्या मुंबईतल्या आझाद मैदानावरील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली.
Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On
  • मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

  • मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

  • दुपारी अंतरवाली सराटीत घेणार पत्रकार परिषद

  • मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस

अक्षय शिंदे, जालना

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आज मनोज जरांगे पाटील दुपारी पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून पाणी, सलाईन आणि सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार पूर्णपणे बंद केले आहेत. आज दुपारी जरांगे पाटील यांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून यामध्ये ते कोणती पुढील भूमिका मांडतात आणि काय मोठा निर्णय जाहीर करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

परवानगीसाठी हालचालींना वेग-

आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरीही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी तातडीने प्रशासकीय आणि कायदेशीर हालचालींच्या सूचना आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत. नियम व अटींच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी रात्रीतून कागदपत्रे पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार गंगाधर काळकुटे यांच्याकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे तातडीने नवीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या नवीन अर्जावर आझाद मैदान पोलfस काय निर्णय घेतात याकडे देखील लक्ष असणार आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली
Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता-

वैद्यकीय उपचार नाकारत मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील आंदोलनावर ठाम असणारे जरांगे पाटील आजच्या पत्रकार परिषदेतून सरकारला कोणता नवा इशारा देतात किंवा आंदोलनाची नवी दिशा काय ठरवतात, याकडे मराठा समाजासह सरकारच देखील लक्ष लागला आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये; उदय सामंत यांचे आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com