EPFO ची मोठी घोषणा! लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्चासाठी काढता येणार भरघोस रक्कम; पाहा A to Z प्रक्रिया

EPFO PF Advance Rule: EPFOने पीएफ ॲडव्हान्स काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. वैद्यकीय उपचार, शिक्षण, विवाह आणि घरासाठी किती वेळा पैसे काढता येतील, जाणून घ्या सोप्या भाषेत.
EPFO PF Advance Rule
EPFO PF Advance RuleSaam Tv
Published On: 

EPFO PF Advance Rule: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी EPF Advance म्हणजेच PF खात्यातून आगाऊ पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे शिक्षण, वैद्यकीय उपचार, विवाह आणि घराशी संबंधित गरजांसाठी PF मधून पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे. EPFOने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर याबाबत माहिती दिली आहे.

PF खात्यातून किती पैसे काढता येतात?

EPFOच्या माहितीनुसार, EPF सदस्यत्वाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदस्यांना त्यांच्या एकूण PF शिल्लकीपैकी ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. या शिल्लकीमध्ये कर्मचारी आणि कंपनीने केलेले योगदान तसेच त्यावर मिळालेले व्याज यांचा समावेश होतो. वैद्यकीय उपचारांसाठी PF Advance काढण्याच्या नियमात सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी कितीही वेळा PF मधून आगाऊ रक्कम काढता येईल. म्हणजेच या कारणासाठी पैसे काढण्यावर ठराविक संख्येची मर्यादा नाही.

शिक्षणासाठी १० वेळा विवाहासाठी ५ वेळा

मुलांचे किंवा स्वतःचे शिक्षण यासाठी PF Advance घेता येतो. मात्र, या कारणासाठी सदस्यत्वाच्या संपूर्ण कालावधीत जास्तीत जास्त १० वेळा PF मधून पैसे काढण्याची परवानगी आहे. स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या विवाहासाठी PF खात्यातून पैसे काढता येतात. या कारणासाठी सदस्याला त्याच्या सदस्यत्वाच्या कालावधीत कमाल ५ वेळा PF Advance घेता येईल.

घरासाठीही मिळणार PF Advance

घर खरेदी करणे, घर किंवा फ्लॅट बांधणे, गृहकर्जाची परतफेड करणे किंवा घराच्या नूतनीकरणासाठीही PF Advance घेता येतो. या गृहनिर्माणाशी संबंधित कारणांसाठी जास्तीत जास्त ५ वेळा पैसे काढण्याची परवानगी आहे. EPFOच्या Category-3 अंतर्गत केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) अधिसूचित केलेल्या विशेष परिस्थितींमध्ये सदस्यांना एका आर्थिक वर्षात दोन वेळा PF Advance घेता येतो. तसेच, नोकरी गेल्यास सदस्याला PF निधीपैकी ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे अचानक आर्थिक अडचण निर्माण झाल्यास PF निधीचा आधार मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com