मोठी बातमी: मनोज जरांगे आज मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार, बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

Manoj Jarange Patil latest news : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. मुंबई आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीत आज महत्त्वाची बैठक आहे.
Manoj Jarange Patil Mumbai protest date announcement
Manoj Jarange Patil Mumbai protest date announcement Saam TV
Published On

अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी

Manoj Jarange Patil Mumbai protest date announcement today : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. मुंबई आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार यापूर्वीच व्यक्त केला आहे. "सरकारकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही," असा आरोप करत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली असून, मुंबईकडे कूच करण्याच्या नियोजनासाठी १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आज दुपारी होणाऱ्या या बैठकीत मुंबई आंदोलनाचे स्वरूप, आंदोलनात सहभागी होणाऱ्या समाजबांधवांचे नियोजन आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील स्वतः मुंबई आंदोलनाची तारीख आणि पुढील कार्यक्रम जाहीर करतील. त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याकडे मराठा समाजासह राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil Mumbai protest date announcement
Pune Police : मुसा, राऊत, गायकवाड ते बंटी..; पुण्यातून एकाचवेळी २७ गुंडांना पोलिसांनी केलं तडीपार, पाहा यादी

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना मुंबईत येऊन शांततामय आंदोलन करण्यापासून रोखणारा प्रतिबंधात्मक आदेश देण्यास नकार दिला आहे. "कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे," असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Manoj Jarange Patil Mumbai protest date announcement
Weather Update: गणपती बाप्पाच्या आगमनाआधी पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

सरकारच्या पातळीवरही या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सरकारने जरांगे यांच्या १५ पैकी १२ मागण्या पूर्ण केल्याचा दावा केला असला, तरी जरांगे पाटील यांनी अद्याप आपला संघर्ष थांबवलेला नाही. आता सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेचा मार्ग पुन्हा खुला होतो का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

परवानगी मिळो अथवा न मिळो, मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत धडक देणार असल्याचा ठाम इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आज अंतरवाली सराटीत होणारी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com