Pune Police : मुसा, राऊत, गायकवाड ते बंटी..; पुण्यातून एकाचवेळी २७ गुंडांना पोलिसांनी केलं तडीपार, पाहा यादी

Pune police action against history sheeters : गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पुणे पोलिसांची मोठी कारवाई. वानवडी, वाघोली, भारती विद्यापीठ, विमानतळ, लोहगाव, लोणीकंद आणि चंदननगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील २७ सराईत गुंडांना तडीपार करण्यात आले आहे.
Pune police news today,
Pune police news today,Saam
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune police expel 27 criminals ahead of Ganeshotsav : गणेशोत्सव पुणे शहरात अत्यंत शांततेत, आनंदात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडावा, यासाठी पुणे पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २७ सराईत गुंडांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या अचानक आणि धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तडीपार करण्यात आलेल्या या आरोपींवर खून, मारामारी, गुन्ह्याचा कट रचणे, तोडफोड, चोऱ्या, विनयभंग आणि बेकायदेशीर दारू विक्री यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सणासुदीच्या काळात शहरात कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी ही मोहीम राबवली आहे.

Pune police news today,
Weather Update: गणपती बाप्पाच्या आगमनाआधी पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

सात पोलिस ठाण्यांची कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच पोलिस ठाण्‍यांनी ३० गुंडांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. वानवडी, वाघोली, भारती विद्यापीठ, चंदननगर, लोहगाव, विमानतळ, लोणीकंद या पोलिस ठाण्‍यांनी ही कारवाई केली.या आरोपींवर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्‍हे दाखल आहेत. त्‍यामध्‍ये ठार मारणे, मारामारी, गुन्ह्याचा कट रचणे, चोरी, तोडफोड, जुगार खेळणे, शिवीगाळ, दारू विक्री, विनयभंग आदी स्‍वरूपाचे गुन्‍हे दाखल आहेत. त्‍यांची नावे पोलिस ठाण्‍यांनी जारी केली आहेत.

Pune police news today,
Pune Bank Scam : पुण्यात बँकेत महाघोटाळा! तब्बल ३४.७७ कोटींचा दरोडा; पोलिसांच्या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ

कोणत्या गुंडांना केलं तडीपार, पाहा यादी-

१.वानवडी – मुसा अबू शेख (वय २५, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर)

२.वानवडी – अशोक महादेव राऊत (वय २८, रा. सुरक्षानगर, हिंगणे मळा, हडपसर)

३.वाघोली – दत्ता रंगनाथ गायकवाड (वय २९)

४.वाघोली – महेश देवराम लोंढे (वय २६)

५.वाघोली – रिना पवन राजपूत (वय ३५)

६.भारती विद्यापीठ – अजिंक्य संतोष काळे (वय २४, रा. आंबेगाव पठार)

७.भारती विद्यापीठ – सरफराज समीर शेख ऊर्फ डर (वय २४, रा. एसआरए वसाहत, कात्रज)

८.भारती विद्यापीठ – महेश ऊर्फ बंटी विनायक चव्हाण (वय २२, रा. खोपडेनगर, कात्रज)

९.विमानतळ – अनिल साहेबराव वीर (वय ४७, रा. इंदिरानगर, बर्मासेल)

१०.विमानतळ – मुकेश बजरंग बुरुंगे (वय ३६, रा. लेन नं. १०, विमाननगर, पुणे)

११.विमानतळ – सागर गौतम अवधूत (वय २९, रा. रामवाडी)

१२.विमानतळ – सुमित ऊर्फ बंटी रणजित गायकवाड (वय २५, रा. रामवाडी )

१३.लोहगाव – गुलाम ऊर्फ गुडडू नवरूलहक मुस्ताफा खान (वय ५०, कलवड वस्ती, लोहगाव)

१४.लोहगाव – शुभम सुखदेव सोनवणे (वय ३८, बीअर फोर्स रोड, लोहगाव)

१५.लोहगाव – दीपक तुकाराम गायकवाड (वय ४६, लोहगाव)

१६.लोहगाव – अतुल गौतम ढोके (वय २५, रा. कलवड वस्ती, लोहगाव)

१७.लोहगाव – आरती संजय साठे ऊर्फ जमदाडे (वय ४३, रा. धानोरी, लोहगाव)

१८ लोणीकंद – सागर राजू ऊर्फ राजेंद्र भालसिंग (वय ३२, रा. कोलवडी, हवेली)

१९.लोणीकंद – सचिन किसन शिंदे (वय ३९, रा. लोणीकंद)

२०.लोणीकंद – हर्षद कुमार शिंदे (वय २४, रा. लोणीकंद, हवेली)

२१.लोणीकंद – रोशन कुमार साहू (वय २४, रा. भावडी, हवेली)

२२.लोणीकंद – अंजिक्य दादासाहेब मस्कुटे (वय २७, रा. खामगाव बु., ता. दौंड)

२३.लोणीकंद – संतोष गोविंद जाधव (वय १८, रा. लोणीकंद)

२४.लोणीकंद – प्रकाश बाबूराव शिवभक्ते (वय २५, रा. खडकआळी, लोणीकंद)

२५.चंदननगर – सुमित सुशील बोरगे (वय ३०, रा. वडगावशेरी)

२६.चंदननगर – गणेश जालिंदर गलांडे (वय ३७, रा. आनंद पार्क, वडगावशेरी)

२७.चंदननगर – अतिश उमेश शिंगरे (वय २३, रा. धानोरी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com