Manoj Jarange Patil Dasara Melava Speech: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायण गडावर पहिल्यांदाच दसरा मेळावा आयोजित केला होता. तब्बल ५०० एकरात झालेल्या या सभेला राज्यभरातून लाखो मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला मोठा इशारा दिला. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीवरुनही जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले. काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? वाचा संपूर्ण भाषण...
"आजच्या साडेतीन मुहर्तापैकी विजयादशमीचा मुहुर्त. दसरा आणि विजया दशमीला विजयाकडे जाण्याचा मार्ग सांगितला जाते. काही असले तरी अन्यायाच्या विरोधात उठाव करावाच लागतो. देव धर्मानेही अन्यायाच्या विरोधात उठाव केला. छत्रपतीच्या मावळ्याने त्यांचे विचार घेऊन उठाव करावा लागतो. आपलाही नाइलाज आह. इच्छा नसतानाही अडवणूक होणार असेल तर माय बापांनो तुम्हालाही उठाव करावाच लागणार आहे.
"मी तर काय केलं. माझ्या समाजानेही काही केलं नाही आमच्या वाट्याला का अन्याय आला? आम्ही काय पाप केले? आमच्या समुदायाच्या पाठीमागे फक्त अन्याय आलाय. माझा समाज, या राज्यातील जनतेसाठी झिजलाय. स्व:तच्या शरिराची झीज केली. या समाजाने दुसऱ्यासाठी मेहनत घेतली. आमचं नेमकं का चुकलं? आम्ही श्रीमांतावर आणि गरिबावर अन्या केला नाही. आम्ही नेमकं काय केलं, हे कुणी सांगेल का? या राज्यातील शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं? आमची चूक काही, हे कुणीतरी सांगावे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"आमच्या बापाच्या, समाजाच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का? जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी दिसून देणार नाही. कोणताही जाहगीरदाराची औलाद येऊ द्या, झुकायचं नाही. कुणावर अन्याय करायचा नाही पण समाजावार अन्याय होणार असेल तर स्व संरक्षण करायचं शिका, तुम्हाला शिकावेच लागेल. मला नारायण गडावर मर्यादा पाडायच्या आहेत. पण जर न्याय मिळाला नाही. तर समुदायासाठी, लेकरासाठी उलथापालथ करावीच लागणार आहे,"
"माझी विनंती आहे, सोन्यासारखी लेकरं वाचवा, समाज वाचवा. समाजाला मान खाली घालावे असे वागू नका. लेकराची आणि समाजाची मान उंचावेल, असे वागावे..कुणी कुणाचे नाही. तुमचे हाल होतात. तुम्हाला वेदना होतात.. तुमची लेकरं अधिकारी बनलेले बघायचे आहे. आपली मुले प्रशासनात जाऊ द्यायचं नाही, अशी अनेकांची इच्छा आहे. आपण आपण मागे हटायचं नाही. आपल्याविरोधात षडयंत्र केले जातेय, डावलले जातेय. शेतकरी, मराठा, १८ पगड जाती असो किंवा ओबीसी असो..सर्वजण आपल्याविरोधात टार्गेट केले जात आहेत पण आता यांना कळल असेल यांना टार्गेट केलं तर संपलं.." असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
"अन्यायाविरोधात मी एक शब्द बोलणार. तुमच्यासाठी ते सर्वस्व आहे. तुम्ही ओळखून घ्यायचे. अन्यायाविरोधात लढायचं हिंदू धर्माने शिकवले आहे. अन्याय सहन करायचा नाही. न्यायासाठी उठाव करायचे शिकवले आहे. आज १४ महिने झाले, उठाव सुरु आहे. सरकारकडे अन्यायाविरोधात मागणी आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या, इथं जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्याच्या आणि केंद्राची सुविधा घेतली. हा जातीवाद नाही. अन्यायाविरोधात उठाव आहे. आरक्षणासाठी आम्ही झुंज देत आहे," असं ते म्हणाले.
"गरिबांसाठी मी झुंजतोय पण मला संपवण्यासाठी षडयंत्र रचले. ज्या गोष्टी समाजासमोर सांगायच्या नाहीत, पण आता सांगावे लागत आहे. माझा त्रास समाजाला आणि समाजाचा त्रास मला सहन होत नाही. माझ्या वेदना तोंडावर कधीच आणत नाही. मला वेदना झाल्यास समाज ढसाढसा रडतो. माझ्या समाजाच्या लेकराला तुमच्यामुळे कलंक लागू देऊ नका. हे राज्यातील सर्वांना सांगतोय. पक्ष पक्ष.. नेता नेता करु नका. समाज सांभाळा, लोकं मोठी होण्यासाठी संभाळा, मला चारही बाजूंनी घेरले आहे. मी तुमच्यात असो किंवा नसो माझा समाज आणि समाजाची लेकरं संपवू देऊ नका," असे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले.
"आरक्षणाची मागणी १४ महिन्यापासून आहे. गोरगरीबासाठी उठाव सुरु आहे. पण एकही मागणी मान्य केली नाही. आमच्या ताटात येऊ नका, तुम्ही आल्याने आमचं संपतेय, तुम्ही मागणी करु नका. तुम्ही या आरक्षणात येऊ नका म्हणायचे. आधीच ४०० जाती आहेत. तुम्ही येऊ नका.. मला याचं उत्तर पाहिजे. इथं जमलेल्या समाजाला उत्तर पाहिजे. काल परवा मोठ्याल्या सतरा जाती आरक्षणात घातल्या.आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणणारा कुठे आहे? आमच्यात येऊ नक म्हणाणारा कुठे आहे. हा काय द्वेष... मराठ्यांचा इतका द्वेष का?" असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले.
"तुम्हीच म्हणाला गोरगरिब ओबीसीच्या आरणक्षाला धक्क लागता कामा नये त्या १७ जाती आल्या.. त्यावेळी आमचा विचार का नाही केला. ज्यावेळी आम्ही आरक्षण मागितले, त्यावेळी एकजण म्हणाला तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर विरोधाकांकडून लिहून घ्या.. तरच तुम्हाला आरक्षण देतो.. तुम्ही या १७ जाती घेतल्या. तुम्ही मविआकडून लिहून घेतले का? मराठ्यांना गोरगरीब ओबीसांनी मुस्लिम दलितांना एक न्याय द्यायचा.. आणि दुसऱ्याला दुसरा न्याय द्यायचा, असे का?" असा सवालही मनोज जरांंगेंनी उपस्थित केला.
"आता सावध व्हा, यांनी तिसरी खुन्नस दिली. तुम्ही कितीही आंदोलनं करा. कितीही झुंज द्या, कितीही एकत्र या आम्ही तुमच्या छातीवर बसून, नाकावर टिच्चून त्यांचा निर्णय घेतला. त्यामुळे यांना उखडून फेका, सुट्टी नाही. मराठ्यांना लढायचं शिकवलाय. आपल्यावर अन्याय होत असेल तर उखडून फेका. इथं नाइलाज आहे. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी लढावेच लागेल. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, महादेव कोळी, कैकाडी, लिंगायत, बंजारा समजाचा वेगळा प्रवर्ग केला पाहिजे, सर्व जाती धर्मासाठी लढणारा आपला समाज आहे. उद्या जर काही गोष्टी करायच्या ठरल्या तर साथ द्या,"
"आचारसंहिता लागण्याच्या आधी या राज्याच्या जनतेच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली नाही तर त्यानंतर जे ठरेल ते तुम्हाला ऐकावं लागेल. इथून मला निर्णय सांगता येत नाही. यांचं सर्व पाहायचं आहे, त्यांनी सर्व केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सर्व केल्यानंतर त्यांचं गणित इस्कटून टाकायचे एकच उलटा निर्णय घ्यायचा.. तुम्हाला शॉर्टकट सांगतोय..तुमच्या मनात असणारी इच्छा पूर्ण कऱण्याची जबाबदारी माझी. तुम्हाला मुख्य भूमिका आचारसंहिता लागल्यानंतर सांगणार आहे. आपल्याला फसवले आहे. आचारसंहिता लागायची, तोपर्यंत विश्वास ठेवायाचा, त्यानंतर आपला निर्णय घेऊ," असेही जरांगे पाटील म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.