मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडच्या नारायण गडावर आज दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याला राज्यभरातून लाखो मराठा बांधव दाखल झाले आहेत. ही ऐवढी प्रचंड गर्दी पाहून जरांगे देखील भारावून गेले. यावेळी 'गर्दीचा आशिर्वाद मिळतो तो दिल्लीला वाकवतो. असे म्हणत भाजपला नकळत इशारा दिला. 'मराठ्यांच्या डोळ्यात कधीही पाणी येऊन देणार नाही. नेहमी समाजाची मान उंचावेल असं वागणार.', असा विश्वास यावेळी त्यांनी मराठा बांधवांसमोर व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील नारायण गडावरून चांगलेच कडाडले आहे. यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'या राज्यात अन्यायाविरोधात उठाव झाला. आजच्या साडेतीन मुहर्तापैकी विजयादशमीचा मुहर्त आहे. दसरा आणि विजयादशमीला विजयाकडे जाण्याचा मार्ग सांगितला जाते. काही असले तरी अन्यायाच्या विरोधात उठाव करावाच लागतो. देव धर्मानेही अन्यायाच्या विरोधात उठाव केला. छत्रपतीच्या मावळ्यांना त्यांचे विचार घेऊन उठाव करावा लागतो. आपलाही नाईलाज आहे. इच्छा नसतानाही अडवणूक होणार असेल तर माय बापांनो तुम्हालाही उठाव करावाच लागणार आहे.'
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, 'राज्य पुढे जावं म्हणून आमचा समाज झिजलाय. स्वत: हातात तलवारी घेतल्या. रक्त आमचं सांडले, अन्यायाचा विनाश आम्ही केला. अत्याचार करणाऱ्यांना उद्धवस्त केले. मग आमच्यावर अन्याय का? आम्ही नेमकं केले का... कुणीतरी सांगा. आमच्या बापाच्या, समाजाच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का? मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी दिसून देणार नाही. कोणताही जाहंगिरदाराची औलाद येऊ द्या... झुकायचं नाही. कुणावर अन्याय करायचा नाही. पण समाजावर अन्याय होणार असेल तर स्वसंरक्षण करायला शिका. तुम्हाला शिकावेच लागेल. आमचा द्वेष काय.आमचा द्वेष कुणालाच सांगता येत नाही.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.