Kolhapur Shahi Dasara : 17 फूट लांब, हाताच्या बोटांनी ऑपरेट करता येणारी गिअर सिस्टीम; कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची शान 'मेबॅक' झाली 88 वर्षाची

Rolls Royce Maybach : कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात रोल्स रॉयसची मेबॅक कार प्रमुख आकर्षण असतं. ही ८८ वर्ष जुनी असून छत्रपती राजाराम महाराज यांनी इसवी सन 1936 च्या मध्ये या कारची ऑर्डर दिली होती.
Kolhapur Shahi Dasara
Kolhapur Shahi Dasara Saam Digital
Published On

रंजित माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत... एक नव्हे... दोन नव्हे तर तब्बल 88 वर्षांची एव्हर ग्रीन कार म्हणजेच मेबॅक कार... कोल्हापूरच्या शाही दसऱ्यातील मे बॅक कार लोकांच्या आकर्षणाचा विषय असतो. विजयादशमीला होणाऱ्या सीमोल्लघनसाठी छत्रपती घराण्यातील सदस्यांचे या मेबॅक मधूनच ऐतिहासिक दसरा चौकात आगमन होते... या जगप्रसिद्ध असणाऱ्या मेबॅक कार ने यंदा 88 वर्षात पदार्पण केले आहे.

जर्मनचा हुकूमशहा अडोल्फ हिटलर अशीच मेक गाडी वापरायचा. त्यामुळे या गाडीला हिटलर रोल्स म्हणून ही ओळखलं जातं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मेक चे उत्पादन बंद पडले. त्यामुळे जगभरात निवडक लोकांकडेच ही कार शिल्लक आहे. त्यापैकी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यामध्ये ही कार आहे. पूर्वी दसरा सोहळ्यासाठी हत्ती, घोडे, उंट यांची रेलचेल असायची.

मात्र काळानुरूप बदल होत गेले आणि या मिरवणुकीत छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात मेबॅक कार ने आपली जागा घेतली. त्यामुळे ही मेबॅक कार आज ही कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात प्रमुख आकर्षण आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील मेबॅक कारचे जतन पुढे छत्रपती शहाजी महाराज आणि त्यानंतर शाहू महाराज यांनी केलेले आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी इसवी सन 1936 च्या सुमारास इंग्लंड इथं 'रोल्स राईस' या कंपनीला मेबॅक गाडी बनवण्याची ऑर्डर दिली.

Kolhapur Shahi Dasara
Bopdev Ghat Case : ७०० पोलीस, ७०० CCTV अन् ८० किमीपर्यंत धागेदोरे; असा सापडला पोलिसांना चकवा देणारा बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी

करवीर संस्थांच्या ध्वजाचा रंग, छत्रपतींचा शिक्का, शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानी अशी वैशिष्ट्ये मेबॅक वर आहेत.गाडीचा मूळ क्रमांक VYF 8773 हा होता. मात्र कोल्हापुरात आल्यानंतर या गाडीचा क्रमांक कोल्हापूर 1 असा करण्यात आलाय. ही कार 17 फूट लांब, सहा फूट रुंद असून त्यात 6 लोक बसू शकतात. हाताच्या बोटांनी ऑपरेट करता येणारी गिअर सिस्टीम , 200 लिटर क्षमतेचा पेट्रोल टॅंक, हॉर्न , उन्हाचा त्रास न होणाऱ्या टिटेडच्या काचा अशा वैशिष्ट्याने मेबॅक परिपूर्ण बनवण्यात आली आहे.

Kolhapur Shahi Dasara
Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेले नोएल टाटा नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com