धनंजय मुंडेंनी रचला जरांगेंच्या हत्येचा कट? आरोपीला जामीन, राज्यात खळबळ

Amol Khune Bail Impact On Munde Jarange Conflict: जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केलाय...अमोल खुणेंच्या जामीनामुळे मुंडे-जरांगे संघर्ष नेमका कसा पेटलाय़? नार्को टेस्टवरून राजकारण कसं तापलयं?
Maratha activist Manoj Jarange Patil during a press interaction amid escalating political tensions in Beed.
Maratha activist Manoj Jarange Patil during a press interaction amid escalating political tensions in Beed.Saam Tv
Published On

जरांगे पाटलांच्या याचं विधानानं घातपाताचा मुद्दा ऐरणीवर आलाय.. काही महिन्यांपूर्वी जरांगेंनी केलेल्या आरोपांवरून तिघांना अटक करण्यात आली होती...त्यातील अमोल खुणे या आरोपीचा जामीन मंजुर झाल्यानंतर त्यांनी जरांगेंवर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केलीय... त्याच मागणीला उत्तर देताना जरागेंनी थेट मुंडेंवरच हत्येचा कट रचल्याचा आरोप केलाय...

मुंडेंनी रचला माझ्या घातपाताचा कट

आरोप-प्रत्यारोपांची ही मालिका इथेच थांबत नाहीये. बीडमधील एका ऑडिओ क्लिपमध्ये 'कराड समर्थक' असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने मनोज जरांगे यांना थेट गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती...

याआधी जरांगे पाटलानी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हानं धनंजय मुंडेंनीही स्विकारलं होतं...मात्र त्यानंतर मुंडे आणि जरांगेंमधील हा वाद काहीसा थंडावला होता... आता अमोल खुणेला हत्य़ेच्या प्रकरणातून जामीन मंजुर झाल्यावर मुंडे आणि जरागेंमधील संघर्ष पुन्हा एकदा विकोपाला गेलाय..त्यामुळे जरांगेंच्या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे? जरांगेंच्या आव्हानाला मुंडे प्रतिआव्हानं देणार का? बीडमधील या संघर्षाचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे सर्वचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com