मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Jarange Targets Shinde: मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केलाय. मात्र, या आरोपांमुळे मराठा समाजातील तरुणांच्या आरक्षणाच्या लढाईत नवा ट्विस्ट आलाय. जरांगे पाटलांनी केलेले आरोप काय आहेत?.आरक्षणाच्या लढाईतील नवा ट्विस्ट काय आहे?. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.
Manoj Jarange Vs Eknath Shinde: Sebc Issue Sparks New Maratha Reservation Controversy
Manoj Jarange Vs Eknath Shinde: Sebc Issue Sparks New Maratha Reservation Controversysaam tv
Published On
Summary
  • मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवं राजकीय वळण मिळालं आहे.

  • महाराष्ट्रात मराठा समाजासाठी 10 टक्के SEBC आरक्षणाचा कायदा करण्यात आला

  • जरांगे हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून OBC आरक्षणाचा लाभ देण्याच्या मागणीवर ठाम

मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि विखेंविरोधात संघर्ष सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आघाडी उघडलीय. जरांगेंनी शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्यामुळे आता या संघर्षाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. आपल्याला शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून SEBC चा मुद्दा काढल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. तर दुसरीकडे, जरांगेंनी केलेले गंभीर आरोप शिंदेसेनेनं फेटाळून लावलेत. जरांगेंचे हे सर्व गैरसमज असल्याचा दावा मंत्री उदय सामंतानी म्हटलंय.

Manoj Jarange Vs Eknath Shinde: Sebc Issue Sparks New Maratha Reservation Controversy
Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

मात्र, शिंदेंनी जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा समोर आणलाय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगलीये. कारण, पुण्यात मूळ SEBC आरक्षण टिकवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. मराठा समाजाला राज्य सरकारनं SEBC तून 10 टक्के आरक्षणाची तरतूद केलीये. एव्हंढच नाही तर गेल्या 3 वर्षांत सरकारनं एकट्या मराठवाड्यात तब्बल 2 लाख 95 हजार 305 प्रमाणपत्रांचं वितरण केलंय. या प्रमाणपत्रांची जिल्हानिहाय संख्या किती आहे तेही पाहूयात.

Manoj Jarange Vs Eknath Shinde: Sebc Issue Sparks New Maratha Reservation Controversy
शिवसेना पक्ष-चिन्ह कुणाचा? सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, एकनाथ शिंदे दिल्लीत; धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवर मोठं विधान

3 वर्षांतील SEBC प्रमाणपत्रांचं वाटप - एकूण - 2 लाख 95 हजार 305

छत्रपती संभाजीनगर

47,826

जालना

35,981

परभणी

39,558

हिंगोली

9,597

नांदेड

40,901

बीड

42,043

लातूर

44,750

धाराशिव

34,649

राज्य सरकारनं मराठ्यांना sebcतून 10 टक्के आरक्षण दिलं खरं..मात्र ते सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही. मात्र सरकारनं नव्यानं कायदा केल्यामुळे सध्या या प्रवर्गातून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं जातंय. याच मुद्यावर अचानक मराठा क्रांती मोर्चानं यात एण्ट्री घेतलीय.

राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं. आणि त्यामुळेच जरांगें आणि सरकारमधील दुरावा वाढत असतानाच मराठा क्रांती मोर्चानं SEBCच्या मुद्यावर पुढे येणं म्हणजे जरांगेंच्या कुणबी दाखल्यांच्या मागणीला शह देण्याची तर ही रणनीती नाही ना? अशीच चर्चा या निमित्तानं सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com