Yewla Accident: चालकाला आली डुलकी; भरधाव कार उतरली नाल्यात, १२ जण जखमी

Manmad Yewla News : मनमाड येथील रेल्वेचा उड्डाण पूल पडल्याने मनमाड ते येवला- शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वेने मनमाडला येवला शिर्डीला जाणारे प्रवाशी उड्डाण पूल संपणाऱ्या ठिकाणी येऊन थांबत असतात.
Yewla Accident
Yewla AccidentSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मनमाडकडून येवला येथे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी वाहतुक करणाऱ्या कारला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. (Manmad) मनमाडहुन काही प्रवाशांना घेऊन सकाळच्या सुमारास जात असताना येवल्याजवळ निजधाम जवळच्या पुलाजवळील नाल्यात गेल्याने झालेल्या (Accident) अपघातात १२ प्रवाशी जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

Yewla Accident
Dharashiv News : १६ डीजे चालकांविरोधात विरोधात गुन्हे दाखल; आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन

मनमाड येथील रेल्वेचा उड्डाण पूल पडल्याने मनमाड ते येवला- शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वेने मनमाडला येवला शिर्डीला जाणारे प्रवाशी उड्डाण पूल संपणाऱ्या ठिकाणी येऊन थांबत असतात. या ठिकाणाहून अनेक खाजगी गाड्यातून वाहतूक होत असते. उड्डाण पूल पडल्याने या ठिकाणाहून खाजगी वाहतूक सुरू झाली. त्यामुळे मनमाडहुन येवला येथे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी वाहतुक करणारी कार मनमाडहुन काही प्रवाशांना घेऊन सकाळच्या सुमारास मार्गस्थ झाली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yewla Accident
Jalna News : बैल चोरी करताना सापडला; शेतकऱ्यांनी चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन

२ प्रवाशी गंभीर जखमी 

गाडी निघाल्यानंतर येवलानजिक निजधाम जवळच्या पुलाजवळील नाल्यात गेल्याने हा अपघात झाला. कार चालकाला डुलकी (Car Accident) लागल्याने भरधाव कार थेट रस्ता सोडून नाल्यात गेल्याचे बोलले जात आहे. या अपघातात १२ जण जखमी झाले असून यातील काही प्रवाशी हे सुरत येथील असल्याचे समजते. जखमी १२ पैकी २ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बाहेरगावी उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com