Dharashiv News : १६ डीजे चालकांविरोधात विरोधात गुन्हे दाखल; आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन

Dharashiv News : उत्सव साजरा करताना डी.जे वाल्यांनी आवाजाची मर्यादा न पाळता जोराच्या आवाजात डीजे वाजविण्यात आले.
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : लग्न, मिरवणुकांमध्ये डीजे वाजविले जात असतात. मात्र यासाठी आवाजाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. परंतु (Dharashiv News) धाराशिव शहरात नुकताच हजरत ख्वाजा शमसुद्दिन गाजी यांचा यांच्या उर्सानिमित्त आयोजित मिरवणुकीमध्ये डीजे चालकांनी आवाजाची मर्यादा पाळली नाही. यामुळे (Police) पोलिसांनी १६ डीजे चालकांवर गुन्हा दाखल करत डीजे जप्त केले आहेत. (Tajya Batmya)

Dharashiv News
Amravati crime: अमरावती हादरले..महाप्रसादाला नेण्याचे सांगत पाच जणांचा तरुणीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धाराशिव शहरात हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी यांचा उरूस साजरा करण्यात आले. या उर्सनिमित्ताने डीजे लावण्यात आले होते. याकरिता (Solapur) सोलापूर, कोल्हापूर, सांगली (Sangli) या भागातून हे डीजे धाराशिव शहरात आणण्यात आले होते. मात्र उत्सव साजरा करताना डी.जे वाल्यांनी आवाजाची मर्यादा न पाळता जोराच्या आवाजात डीजे वाजविण्यात आले. यामुळे रस्त्यावर व परिसरात त्रास जाणवत होता. डीजे चालकांनी आवाजाची मर्यादा न पाडल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी डीजे वाजविणे बंद केले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dharashiv News
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील १९५ गावे, २२१ पाड्यांमध्ये पाणीटंचाई; कमी पावसाचा परिणाम

पोलिसांकडून डीजे जप्त 

यानंतर धाराशिव पोलिसांनी तब्बल १६ डीजे वाजविणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केले. इतकेच नाही तर डीजे व वाहन जप्त केले आहेत. तसेच आता इथून पुढे कुठल्याही उत्सवात आवाजाची मर्यादा सोडली, तर डीजेवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी दिला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com