Manikrao Kokate : काहीतरी मोठं होणार? माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, अजित पवारांनी दौरे रद्द केले, CM फडणवीसांची घेतली भेट

Manikrao Kokate Arrest Warrant News Update : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील शिक्षा कायम राहिल्यानंतर अटक वॉरंटची शक्यता वर्तवली जात आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateSaam TV Marathi
Published On

Manikrao Kokate not reachable arrest warrant news : ऐन माहापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसलाय. कोर्टाने मंत्रि माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात कोकाटेंना अटक होणार, याची चर्चा सुरू झाली. राजकीय वातावरण तापले असतानाच क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा फोन बंद असल्याचे समोर आलेय. तर दुसरीकडे अजित पवार यांनी आजचे सर्व दौरे रद्द केले. अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. माणिकराव कोकेटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत जोरदार धक्का बसू शकतो. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे बोलले जातेय.

माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल -

नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. त्या निकालानंतर मंत्री कोकाटे नॉट रीचेबल आहेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. त्यांचा फोनही बंद असल्याचे समोर आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे. अटक वॉरंट निघाल्यास कोकाटे यांना अटक होऊ शकते,असे बोलले जात आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

Manikrao Kokate
मोठी बातमी! महायुतीच्या मंत्र्याला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, अटक वॉरंटबाबत अपडेट आली समोर

अटक वॉरंट निघणार ?

१९९५ च्या प्रकरणात कोर्टाने मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. कोकाटे यांचे दुसऱ्यांदा मंत्रिपद धोक्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री माणिकराव कोकटे यांचं आज अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधूंनी सदनीका लाटल्याचं प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अटक वॉरंट प्रकरणात थोड्याच वेळात सुनावणीला सुरूवात होणार आहे.

Manikrao Kokate
मोठी बातमी! महायुतीच्या मंत्र्याला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, अटक वॉरंटबाबत अपडेट आली समोर

अजित पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द, फडणवीसांची तातडीने भेट -

इकडे माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहेत, तर दुसरीकडे अजित पवार यांनी आजचे आपले सर्व नियोजित दौरे रद्द केले आहेत. अजित पवार यांचा आज नांदेड दौरा होता. पण त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कोकाटे यांच्या अटकेवर चर्चा झाल्याचे समजतेय. त्याशिवाय मंत्रिमंडळात नवाब मलिक यांना घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहितीही खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीवेळी कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसू शकतो.

Manikrao Kokate
CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com