Nagpur Accident: नागपुरात लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू

Nagpur Car Truck Accident News: नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. काटोल तालुक्यात ट्रकच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Nagpur Katol Accident News
Nagpur Katol Accident NewsSaam TV
Published On

Nagpur Katol Car Truck Accident News

नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंगाचा थरकाप उडवणारी घटना काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात शुक्रवारी (१६ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Katol Accident News
Sambhajinagar News: खेळता-खेळता चिमुकला पाण्यात पडला; वाचवायला बहिणीनेही घेतली उडी, दोघांचाही बुडून मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रमेश हेलोंडे, सुधाकर मानकर, विठ्ठल धोटे, अजय चिखले, वैभव चिखले, मयुर इंगळे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जगदीश ढोणे गंभीर जखमी झाला आहे.

प्राथामिक माहितीनुसार, मृत व्यक्ती हे काटोल तालुक्यातील (Nagpur News) रहिवासी होते. शुक्रवारी ते नागपूरमध्ये एका लग्नसमारंभासाठी आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण कारमधून काटोलच्या दिशेने परतत होते.

मध्यरात्री कार सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान आली असता, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील ६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच जखमीवर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Nagpur Katol Accident News
Pune Crime News: पुण्यात १७ वर्षीय मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार; लोणी काळभोर परिसरातील धक्कादायक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com