Pune Crime News: पुण्यात १७ वर्षीय मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार; लोणी काळभोर परिसरातील धक्कादायक घटना

Pune Latest Crime News: अल्पवयीन मुलीला कपडे धुण्यासाठी रुममवर बोलावून घेत तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केला आहे.
Pune Latest Crime News
Pune Latest Crime NewsSaam TV
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही | पुणे, १६ डिसेंबर २०२३

Pune Latest Crime News

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला कपडे धुण्यासाठी रुममवर बोलावून घेत तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केला आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Latest Crime News
Mumbai Mega Block: मुंबईकरांचा होणार खोळंबा, रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सुदर्शन शेरमाळे (मुळ रा. मनमाड जि. नाशिक सध्या रा. हांडेवाडी ता. हवेली) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील असून हांडेवाडी येथे रूम भाड्याने घेऊन राहतो.नोव्हेंबर महिन्यात आरोपीने पीडित मुलीला कपडे धुण्याच्या बहाण्याने रूमवर बोलवून घेतले.

यानंतर त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच तीन वेगवेगळ्या दिवशी जबरदस्तीने शारीरिक संबंध (Crime News) ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी घडला आहे.

दरम्यान, आरोपीचं कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिकचा लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Pune Latest Crime News
Hardik Pandya: हार्दिक पंड्या कर्णधार बनताच मुंबई इंडियन्सचं मोठं नुकसान? फॉलोअर्सची संख्या झपाट्याने घटली!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com