Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ शपथविधी, विस्ताराचा मुहूर्त ठरला; ठिकाणाबाबत संभ्रम; इच्छुकांमध्ये धाकधूक

Mahayuti Cabinet Expansion: मंत्रिमंडळाचा विस्तार हा १४ तारखेल होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु ऐनवेळी नियोजनाचा अभाव पडू नये यामुळे राजभवनात देखील तय्यारी सुरू असल्याची शक्यता.
Mahayuti
Mahayuti Cabinet ExpansionOne India
Published On

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची कोंडी अजून फुटली नाहीये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन तीन आठवडे झालेत. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं अजून अडल्याचं दिसत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या होणार असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र याबाबत अजून संभ्रम कायम आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कुठे होणार याचा सस्पेन्स कायम असतानाच राजभवनावर देखील तय्यारी सुरू झालीय.

मंत्रिमंडळाचा शपथविधी कुठे होणार?

मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे. राजभवनात उद्या नवीन मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. पण याबाबत अजून दुसरी अपडेट समोर आलीय. मंत्र्यांचा शपथविधी हा नागपूर येथे होणार असल्याचं म्हटलं जातंय. हिवाळी अधिवेशनातच शपथविधी होईल अशी शक्यता आहे. पण राजभवनातील तय्यारीने चर्चांना उधाण आले आहे.

Mahayuti
Maharashtra Politics: २१-१२-१०... महायुतीचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला, कुणाकडे कोणती खाती?

नवीन सरकार स्थापन होऊन तीन आठवडे लोटले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतिक्षेत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा १४ तारखेला होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ऐनवेळी नियोजनाचा अभाव पडू नये, त्यामुळे राजभवनात देखील तय्यारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. राजभवनावर मंडप, माईक आणि इतर साहित्य दाखल झाले आहे. तर राजभवनाकडे जाणाऱ्या मार्गांच देखील सुशोभीकरण करण्यात येतंय. याचवेळी आमदाराच्या सोईसाठी नागपुरातच शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळाबाबत संभ्रम निर्माण झालाय.

Mahayuti
Eknath Shinde : शिवसेनेचं ठरलं! खातेवाटप पूर्ण, नगरविकासवर शिक्कामोर्तब, कुणाला लागणार लॉटरी?

ठिकाण वेळ का निश्चित होईना?

महायुतीच्या मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहितीही समोर आलीय. सर्वाधिक आमदार असणाऱ्या भाजपकडे २० पेक्षा जास्त खाती राहतील. तर शिंदेंच्या शिवसेनेकडे १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रि‍पदे दिले जातील असं म्हटलं जातंय. मात्र यात आमदारांची धाकधुक वाढलीय. तर मंत्रिपदात डच्चू भेटण्याची शक्यता काही आमदारांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या यादीत आमदार भरत गोगावले आणि तानाजी सावंत यांचे नाव नसल्याचे सांगितलं जात आहे. आता दोन्ही नेते भेटीसाठी वर्षावर दाखल झालेत.

भाजपकडे ही खातीअसणार?

विधानसभेला भाजपचे सर्वाधिक १३२ आमदार निवडून आलेत. त्यांच्याकडे सर्वाधिक खाती राहतील. भाजपमधील खातेवाटप आणि मंत्रि‍पदाची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. याची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडे मुख्यमंत्रि‍पदासह गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, गृहनिर्माण, ग्रामविकास, पर्यटन, वने, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास, विधी व न्याय ही खाती राहण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा फॉर्म्युला?

एकनाथ शिंदेंना १२ ते १३ खाती मिळण्याची शक्यता आहे. तर नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. भाजपकडून नगरविकास खात्याऐवजी महसूल खात्याची ऑफर देण्यात आली होती. पण एकनाथ शिंदेंनी नगरविकास सोडण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. नगरविकास मंत्रालयासह सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य. उद्योग, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंधारण, पणन, शालेयशिक्षण ही खाती शिवसेनेला मिळती असं म्हटलं जातंय.

शिवसेनेकडून ५ ते ६ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com