Eknath Shinde : शिवसेनेचं ठरलं! खातेवाटप पूर्ण, नगरविकासवर शिक्कामोर्तब, कुणाला लागणार लॉटरी?

Shiv Sena Eknath Shinde : शिवसेनेचे खातेवाटप जवळपास निश्चित झालेय. महायुतीच्या मंत्रिमंडळात नगरविकास खाते शिवसेनेकडेच राहणार असल्याचे समोर आलेय. शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam tv
Published On

Shiv Sena Maharashtra Cabinet Expansion: गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता रूळावर आल्याचे समजतेय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं मंत्रिमंडळाचे खाते वाटप पूर्ण झाल्याचे समजतेय. भाजपचीही अंतिम यादी तयार झाली असून दिल्लीमधील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडूनही आपल्या आमदारांची मंत्रि‍पदासाठी निवड करण्यात आली आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवारी दुपारी १२ वाजता राजभवनात होणार आहे.

शिवसेनेचे खाते वाटप पूर्ण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एकनात शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास खाते मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झालेय. तर पर्यावरण ऐवजी पर्यटन खाते मिळण्याची शक्यता आहे. जी खाती शिवसेनेला मिळाली त्या पैकी काही खात्याचे मंत्री कोण असणार हे देखील निश्चित झाले आहे. मात्र काही खात्यांचे मंत्री ठरणे बाकी आहे. कॅबिनेट प्रमाणेच राज्य मंत्री कोण असणार हा देखील विचार सुरू आहे. त्यामुळे 14 तारखेला शपथ विधी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Eknath Shinde
Maharashtra Politics: २१-१२-१०... महायुतीचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला, कुणाकडे कोणती खाती?

महायुतीमध्ये सर्वाधिक मंत्री भाजपचे राहतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ ते १३ मंत्रि‍पदे मिळू शकतात. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल. एकनाथ शिंदे यांच्याकडून जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे. २४ तासांमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी जाहीर होऊ शकते.

Eknath Shinde
Eknath Shinde News : सत्तानाट्यानंतर खातेनाट्य सुरु, गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंपुढे कोणते ३ पर्याय? मोठी अपडेट आली समोर

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण?

एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री

उदय सामंत -

शंभुराजे देसाई

दीपक केसरकर

भारत गोगावले

दादा भुसे

गुलाबराव पाटील

मंजुळा गावित

संजय राठोड

संजय शिरसाट

इच्छूकांची यादी मोठी, अडीच वर्षांचा फॅार्मुला -

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दूसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षांत मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे. या फॅार्मुलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.

शिवसेनेच्या वाट्याला कोण कोणती खाती?

एकनाथ शिंदे यांना १२ ते १३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कळीचा मुद्दा ठरलेल्या नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. भाजपकडून नगरविकास खात्याऐवजी महसूल खात्याची ऑफर देण्यात आली होती. पण एकनाथ शिंदेंनी नगरविकास सोडण्यास नकार दिला. नगरविकास मंत्रालयासह सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उथ्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंधारण, पणन, शालेयशिक्षण ही खाती शिवसेनेकडे राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय विधान परिषदेचे नेतेपद आणि सभापतीपदही शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com